मुंबई : सोनाक्षी सिन्हा मीडियाशी नेहमीच आपुलकीने वागते. पण सध्या सोनाक्षी मिडीयापासून लांब पळतांना दिसते आहे. फ्लॉप सिनेमे आणि बॉयफ्रेण्ड बरोबर ब्रेकअपमुळे तर सोनाक्षी मीडियापासून लांब पळत नाही ना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोनाक्षी सिन्हाचे ग्रहमान फिरल्याचं दिसतयं.त्यामुळेचं तर सोनाक्षी मीडियापासून लांब पळतांना दिसते आहे.नुकतीच सोनाक्षी मुलींच्या शिक्षणाविषयी जनजागृती करणाऱ्या एका सामाजिक कार्यक्रमात उपस्थित होती.


सोनाक्षीने या कार्यक्रमात उपस्थित लहान मुलींबरोबर फुल टु मस्ती केली..पण मीडियाशी संवाद साधण्याची वेळ येताचं सोनाक्षीचा मूड बिघडला. 


सोनाक्षी बॅक टु बॅक सिनेमे फ्लॉप झाल्यामुळे चांगलीच अपसेट झालेली दिसतेयं, त्यामुळेचं तर सोनाक्षी सिनेमाशी रिलेटेड आणि पर्सनल कोणत्याच प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर देत नसल्याचं दिसतंय.