कपिल शर्माच्या सेटवर असं काय घडतं? की आघाडीचे कलाकार शो सोडून कायमचे निघून जातात
कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्ये कपिलच्या मावशीची भूमिका साकारणाऱ्या उपासना सिंगनेही कपिलचा शो अचानक सोडला होता.
मुंबई : 'द कपिल शर्मा शो' हा टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय शो आहे, या कॉमेडी शोच्या माध्यमातून कपिल शर्मा आपल्या सहकलाकारांसह प्रेक्षकांना खळखळून हसवतोया शोशी संबंधित प्रत्येक पात्राची वेगळी ओळख आहे.
पण या शोमधील असे अनेक कॉमेडियन आहेत ज्यांनी तडकाफडकी आणि अचानक हा शो सोडला आहे.
कुणाचा कपिलशी वाद झाला, तर कुणी वैयक्तिक कारणांमुळे शो सोडला. कपिल शर्माच्या शोमधील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांमध्ये चांगलीच पसंती मिळाली आहे.
प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. अशा परिस्थितीत असे काही कॉमेडियन आहेत ज्यांना प्रेक्षक अजूनही मिस करत आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा कपिलच्या शोमध्ये बघायचे आहे.
सुनील ग्रोवर कपिल शर्मा शोचा सर्वात लोकप्रिय चेहरा ठरला. सुरुवातीपासूनच कपिलच्या शोमध्ये त्याच्या वेगवेगळ्या पात्रांनी लोकांचे मनोरंजन केले. कधी गुत्थी बनून तर कधी डॉक्टर मशहूर गुलाटी बनून सुनीलने प्रेक्षकांना खूप हसवले आहे.
पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा हे दोन स्टार्स एकत्र ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांच्यात झालेल्या वादामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर सुनील कपिलचा शो अचानक सोडला.
शोमध्ये कपिलच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या अली असगरनेही कपिलसोबत झालेल्या भांडणामुळे शो सोडून दिला. याबद्दल बोलताना अलीने सांगितले की- मी शोमध्ये बराच काळ काम केले पण नंतर मला वाटले की मी आयुष्यात पुढे जावे, कारण माझ्या आणि कपिलमध्ये काही कामाबाबत मतभेद होऊ लागले.
नवज्योत सिंग सिद्धू हे कपिलच्या शोचा एक विशेष भाग बनले होते. सिद्धू पाजी त्यांच्या कविता आणि हटके अंदाज यामुळे शोमध्ये वेगळीच बहार आणायचे. पण 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धू यांच्या एका वक्तव्यामुळे त्यांना हा शो सोडवा लागला.
कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्ये कपिलच्या मावशीची भूमिका साकारणाऱ्या उपासना सिंगनेही कपिलचा शो अचानक सोडला होता. याबद्दल बोलताना उपासना म्हणाली की, तिला तिच्या भूमिकेतून समाधान मिळाले नाही.