Vijay Sethupati on Jawan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. त्याचं कारण हे चित्रपटाचा प्रीव्ह्यू आणि त्यासोबत चित्रपटाची इतकी मोठी स्टार कास्ट. या चित्रपटात आपल्याला दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार आहे. त्याची चित्रपटात खलनायकाची भूमिका असणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला चित्रपटाच्या प्रीव्ह्यूमध्ये विजयचा लूक पाहून तर त्याच्या चाहत्यांची आतुरता वाढली आहे. विजयनं या चित्रपटाला होकार का दिला त्याचं कारण काय होतं असा प्रश्न अनेकांसमोर होता. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयनं या चित्रपटाला होकार देण्यामागचं खरं कारण काय ते आता त्यानं सांगितलं आहे. इतकंच नाही तर चित्रपटासाठी त्यानं मानधनही घेतलं नसल्याचा खुलाला केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय सेतुपतीनं नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत एटलीच्या ‘जवान’मध्ये काम करण्यासाठी होकार देण्याचं खास कारण विजयनं सांगितलं आहे. "मी जवानला होकार देण्याचं एकमेव कारण शाहरुख खान सर होते. मला त्या चित्रपटासाठी एकही रुपया मिळाला नसला तरी मी त्यांच्यासाठी चित्रपटाला होकार दिला असता", असं विजय सेतुपती म्हणाला.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, शाहरुखनं 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘सुपर डिलक्स’ या चित्रपटातील विजय सेतुपतीच्या अभिनयाची स्तुती केली होती. या चित्रपटात विजयनं एका तृतीयपंथीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यागराजन कुमार राजा यांनी केले होते. 


रिपोर्ट्सनुसार, जवानच्या सेटवर पहिल्या दिवशी शूटवर कसा अनुभव होता तेव्हा मनात काय विचार सुरु होते याविषयी विजयनं सांगितलं होतं. विजय म्हणाला "पहिल्या दिवशी मला अस्वस्थ वाटतं होतं, पण शाहरुख खाननं माझी एका मुलासारखी काळजी घेतली. पहिला दिवशी तर मी खूपच अस्वस्थ होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं पहिल्या दिवसाचं शूट हे त्यांच्यासोबत नव्हतं. पण मला खूप मज्जा आली. एसआरकेसोबत काम करायला खूप आवडलं." 


हेही वाचा : बेशुद्ध मुलगी, कोल्ड ड्रिंक्समध्ये ड्रग्स आणि कपडे...; 'संतोषी मां' फेम अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव


जवान चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन एटलीनं केलं आहे. या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती सान्या मल्होत्रा, गिरिजा ओके गोडबोले, सुनील ग्रोव्हर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.