`आम्हाला हार्ट अटॅक आला तर शाहरुख जबाबदार!’ असं का म्हणाले जयदीप, विजय वर्मा
Vijay Varma on Shah Rukh Khan : विजय वर्मा आणि जयदीप अहलावतनं त्यांना जर हार्ट अटॅक आला तर त्यासाठी शाहरुख खानला का जबाबदार ठरवलं आहे.
Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं यंदाच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर त्याचं नाव कोरलं आहे. पण त्याला दुसऱ्याच कलाकारांचा चित्रपट आवडला आहे. हे अभिनेता दुसरे कोणी नाही तर विजय वर्मा आणि जयदीप अहलावत आहेत. शाहरुखनं या दोघांना 'जाने जान' हा चित्रपट पाहिल्यानंतर कॉल करून त्यांची स्तुती केली आहे. याविषयी विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
'इंडिया टुडे मुंबई कॉन्क्लेव 2023' ला ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत विजय वर्मासोबत जयदीप अहलावत देखील होता. विजयनं यावेळी म्हणाला की शाहरुखनं जेव्हा कॉल केला होता, तेव्हा त्यानं किंग खानला सांगितलं की जर मला हार्ट अटॅक आला तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. जयदीप अहलावतनं सांगितलं 'त्यांनी मला कॉल केला आणि म्हणाले, जर तुम्ही व्यस्त नसाल, तर मला तुमच्याशी बोलायचं होतं. मी शाहरुख बोलतोय. मी त्यांना म्हणालो की जर मला हार्ट अटॅक आला तर त्याला तुम्ही जबाबदार आहात.' विजय आणि जयदीप हे दोघेही शाहरुखचे मोठे चाहते आहेत.
शाहरुख खानच्या व्यक्तिमत्त्वाविषयी विजय वर्मा म्हणाला...
विजय वर्मा पुढे शाहरुख खानचा चित्रपट पाहत कसा मोठा झाला हे सांगत पुढे म्हणाला की 'मी जवान पाहिला आहे, त्याचा आनंद घेतला आहे. तो खूप चांगला आणि मजेदार चित्रपट होता. श्री. शाहरुख खान यांनी जाने जान पाहिला. त्यांनी आम्हाला बोलावलं, त्यांनी मला बोलावलं आणि जयदीपला बोलावलं. आम्ही शाहरुखच्या सावलीत राहतोय, त्याच्या फेजमध्ये जगतोय. शाहरुखला भेटणं आणि त्याच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. अशा व्यक्तीविषयी काय बोलायचे ज्याच्या सगळ्या गोष्टींमधून प्रेरणा मिळते. त्यांनी आतापर्यंत एक बेंचमार्क सेट केला आहे ज्याला केवळ तेच मोडू शकतात.'
पुढे विजय वर्मा म्हणाला की 'या सगळ्या गोष्टी जेव्हा पण मी त्यांना भेटतो, फक्त तेव्हा एक अभिनेता म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून देखील, एका व्यक्तीमत्त्वाच्या रुपात, एका स्टारच्या रुपात आणि प्रत्येक क्षणा विषयी बोलू शकतो. हे इतकं महत्त्वपूरण आहे की ही पाच सेकंदाची भेट किंवा मग फक्त हात मिळवण्या पर्यंत का होईना. तुम्हाला त्याच्यासोबतचा तुमचा वेळ तुम्हाला नेहमी आठवतो. अशा लोकांपैकी तो एक आहे; तो तुमच्या हृदयाला स्पर्श करतो.'
हेही वाचा : गौतमी पाटीलला कोकणात 'नो एन्ट्री'? कार्यक्रम का रद्द झाला?
दरम्यान, विजय वर्मा, जयदीप अहलावतसोबत या चित्रपटात करीना कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातून करीनानं ओटीटीवर पदार्पण केलं आहे.