Ajay Devgn to confess to his crimes: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण प्रमुख भूमिकेत असलेसा मिस्ट्री थ्रिलर 'दृश्यम 2' चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात तब्बू, इशिता दत्ता, अक्षय खन्ना, रजत कपूर आणि श्रिया सरन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 2015 मध्ये आलेल्या 'दृश्यम' चित्रपटाचा सिक्वेल आहे. विजय साळगावकरची फाईल्स पुन्हा या चित्रपटातून पुन्हा एकदा उघड होणार आहे. चित्रपटाची कथा 2 आणि 3 ऑक्टोबरच्या रहस्यावर आधारित आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाचं दुसरं टीझर समोर आल्यानंतर सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचला आहे. 1 मिनिट 20 सेकंदाच्या टीझरच्या शेवटी, अजय देवगणचे पात्र त्याचे कबुलीजबाब रेकॉर्ड करताना दिसू शकते. टीझर पब्लिश करताना अजय देवगण याने लिहिलं आहे की, 'विजय आणि त्याच्या कुटुंबाची गोष्ट तर तुमच्या लक्षात असेल ना? की आठवण करून देऊ?'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, अजय सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत आगामी 'थँक गॉड' या कॉमेडी चित्रपटात देखील दिसणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय, त्याच्याकडे बोनी कपूरचा स्पोर्ट्स पीरियड चित्रपट 'मैदान' देखील आहे जो 17 फेब्रुवारी 2022 रोजी रिलीज होणार आहे.