मुंबई : झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी कायम नवनवीन मालिका घेऊन येत असते. आता झी मराठीवर लवकरच नवी मालिका येणार आहे. ' 'नवा गडी नवं राज्य'' असं या मालिकेचं नाव असून नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं... असं कितीही म्हटलं तरी प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. जगावेगळी प्रेम कहाणी आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो  नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते, कश्यप परुळेकर, साईशा भोईर हे कलाकार या मालिकेत मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. प्रोमोच्या सुरुवातीला आनंदी लग्न करुन घरात आल्याचं दिसतयं. यानंतर घरातील सदस्य नाराज असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. एवढ्यात फोटोतून रमा म्हणते 'नाही झेपणार तुला'... यानंतर रमा आणि आनंदी या दोघांमध्ये चांगलीच जुंपते. या सगळ्यावरुन ही मालिका एक वेगळा विषय  मांडणार असल्याचं दिसत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


झी मराठीने सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर केला आहे. या सोबतचं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, 'जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो....त्या दोघींच्या संसाराची एक गोड गोष्ट....नवी मालिका 'नवा गडी नवं राज्य' ८ ऑगस्टपासून, सोम ते शनि रात्री ९ वा'. त्यामुळे आता झी मराठी वरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.