पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री करणार भारतात काम? म्हणाली...
पाकिस्तानी अभिनेत्री सनम सईद ही `जिंदगी गुलजार है` मधून घराघरात पोहोचली आहे. भारतात काम करणार का? यावर अभिनेत्रीने उत्तर दिलं आहे. काय म्हणाली अभिनेत्री? वाचा सविस्तर
Sanam Saeed : पाकिस्तानी अभिनेत्री सनम सईद 'जिंदगी गुलजार है' मधील कशफ मुर्तझा या भूमिकेने प्रसिद्धी आहे. जिंदगीच्या नवीन शो 'बरजाख' द्वारे ती मुख्य प्रवाहात परतली आहे. जिथे ती 12 वर्षांनंतर फवाद खानसोबत पुन्हा एकत्र आली आहे. सनम सईदने भारतात येण्याच्या आणि येथे काम करण्याच्या संधींबद्दल देखील माहिती दिली आहे.
तिने म्हटलं की, भारतात मिळणाऱ्या प्रेमाची जाणीव आहे. पण भारतात काम करणे यावर ती चर्चा करत आहे. भारतातून किती प्रेम मिळते आणि मी कधीच भारतात गेले नाही. जिंदगी लाँच झाली तेव्हा मी येऊ शकले नाही. राजकीय परिस्थितीमुळे भारताला दुरुनच प्रेम करु द्या. असं तिने म्हटलं आहे.
सनम भारतात काम करेल का?
आम्हाला भारताकडून इतकं प्रेम मिळतं हे आश्चर्यकारक आहे. मी कधी भारतात गेली नाही. 'जिंदगी गुलजार है' सुरू झाली तेव्हा मी येऊ शकले नाही. सध्या चालू असलेली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन भारताने माझ्यावर दुरूनच प्रेम करु द्या. त्या तणावातून जाणे, धोका आणि भीती ही चांगली भावना नाही. पुढे सनम म्हणाली, बर्जाखमध्ये जसा संवाद आहे. प्रेमाला अनेक आयाम, मार्ग आणि पैलू असतात. त्यामुळे मला वाटतं हे भारत-पाकिस्तानचं कलाकारांचं प्रेम आहे. हा त्या प्रेमाचा एक मार्ग आहे.
मात्र, मी भारतात भेट देण्यासाठी नक्की येईल. पण टूरसाठी यायला आवडेल. कारण भारतात पाहण्यासारखे खूप काही आहे. असं तिने यावेळी म्हटलं आहे.
राजकीय वातावरणावर प्रतिक्रिया
भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावाचा परिणाम सीमेपलीकडील कलाकारांवर झालाय. जेव्हा ती सीमेच्या पलीकडे प्रकल्पावर स्वाक्षरी करते तेव्हा हा ताण तिच्यावर परिणाम करतो का? असे विचारले असता अभिनेत्री म्हणाली, प्रॉडक्शनच्या बाबतीत कोणतीही भीती नाही, कारण जहाजाची कॅप्टन शैलजा सोबत असते. तिच्यासोबत काम करून खूप छान वाटले. ती कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे आम्ही इतर समस्या सोडू शकतो. लोकांना आनंद देईल आणि जगाला आकर्षित करेल अशी सामग्री तयार करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. जेव्हा तुमच्याकडे असे लोक प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी असतात, तेव्हा तुमच्या आजूबाजूला काय चालले आहे याची आम्हाला पर्वा नसते. असं तिने सांगितले आहे.