सिम्पल लूकमध्ये इतकी सुंदर दिसली सारा, लोक म्हणाले- `हमारी भाभी...`
क्रिकेटचा देव सचिन तेंडुकरची लेक सारा तेंडूलकर बऱ्याच दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. आणि यामागचं कारण म्हणजे क्रिकेटर शुभमन गिल. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे.
मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुकरची लेक सारा तेंडूलकर बऱ्याच दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. आणि यामागचं कारण म्हणजे क्रिकेटर शुभमन गिल. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. सारा तेंडूलकरचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा ती सिनेसृष्टीत एन्ट्री करणार असल्याचंही बोललं जातं. नेहमीच ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेकदा तिच्या लग्नाच्या अफवाही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. या सगळ्या दरम्यान पुन्हा एकदा साराच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला आहे.
नुकताच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारा सोज्वळ लूकमध्ये दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सारा सिंपल ड्रेसमध्ये दिसत आहे. साराच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक यावेळी पाहायला मिळत आहे. गोड स्माईल देत सारा कारमधून उतरुन लिफ्टकडे जाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहते तिच्या लग्नाबद्दल तिला कमेंट बॉक्समध्ये विचारताना दिसत आहे. विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, आज आम्ही तिला टाऊनमध्ये कॅप्चर केल्यावर साराच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसत आहे.
सारा तेंडूलकरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी साराच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजर्सने कमेंट करत लिहीलं आहे की, आमची वहिनी कशी असावी? सारा वहिनीसारखी असावी. तर अजून एकाने लिहीलंय की, क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी सारा तर अजून एकाने लिहीलंय, ‘शुबमन गिल ठिक झाला असेल तर फायनल अजून बाकी आहे. तर अजून एकाने लिहीलंय, सारा गिल. तर अजून एकाने लिहीलंय, तर अजून एकाने लिहीलंय सारा गिल आहे ती. तर अजून एकजण म्हणतोय सारा शुभमनसाठी नटली आहे. तर अनेकजण तिच्या साधेपणाचं कौतुक करताना दिसतायेत. तर अनेकांनी तिच्या फोटोवर हार्ट ईमोजी पाठवले आहेत.
सारा आणि शुभमन गिलच्या नात्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर या दोघांचे अनेक फोटोही व्हायरल होत असतात. मात्र या दोघांनीही यावर कधीच आपलं स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे त्यांचं नातं हे केवळ अफवाच आहे असंतरी अद्याप म्हणावं लागेल.