Sayali Sanjeev On Maharastra Politics: गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) चर्चेचा विषय आहे. मराठी मालिका आणि मागील चित्रपटांमुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो. अशातच सायलीने राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याबाबत भाष्य केलं आहे. सायली संजीवची महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट (MNS) कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती देखील करण्यात आली होती. त्यानंतर तिने आपले मुद्दे वेळोवेळी मांडले होते. अशातच आता तिने राजकारणातील प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य केलंय.


काय म्हणाली सायली संजीव?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भविष्यात नाशिकचा नगरसेवक, आमदार किंवा खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का? असा सवाल सायलीला (Sayali Sanjeev) विचारण्यात आला होता. त्यावेळा सायलीने मोठा खुलासा केला आहे. तिने तिच्या राजकीय कारकिर्दीवर (Political Career) पहिल्यांचा मोठा खुलासा केला आहे. मला याबद्दल जास्त काही माहित नाही. कदाचित असेलही,  कारण नक्कीच मला काम करायला आवडेल, असं सायली म्हणाली आहे.


Sayali Sanjeev म्हणते...


आता सध्या मी एका पक्षामध्ये आहे. पक्षाच्या एका पदावर मी आहे. त्यामुळे त्या पक्षाची बाजू मी मांडणार, ही साहजिक गोष्ट आहे. मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाची बाजू मांडताना जर माझ्यावर टीका होत असेल तर ती टीका मी स्वीकारते, असं रोखठोक वक्तव्य सायली संजीवने केलंय. ही टीका स्वीकारणं गरजेचंच आहे. संबंधित पक्षाची विचारधारा पुढं नेण्यासाठी तुम्हाला विचार मांडावे लागतात. त्यामुळे टीका होत असली तर, त्याचा मला फरक पडत नाही, असं उत्तर सायलीने यावेळी दिलंय.


आणखी वाचा - आता लग्न होईल तेव्हाच... ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरबाबत सायली संजीवने विषयच संपवला


दरम्यान, मराठी चित्रपटात सायलीने ताकदीच्या भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पिवळ्या ड्रेसवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाड याच्यासह तिचं नाव जोडलं गेलं होतं. त्यामुळे चर्चांना उधाण आल्याचं देखील दिसलं होतं. त्यामुळे आता सायली पुन्हा सक्रिय राजकारणात एन्ट्री करणार का? असा सवाल विचारला जातोय. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर भाष्य केलंय.