ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राडा, पत्नीवर विनोद केल्यामुळे होस्टला शिवीगाळ करत कानशिलात
Will Smithच्या पत्नीवर विनोद... भडकलेल्या अभिनेत्याने होस्टच्या लगावली कानशिलात... व्हिडीओ व्हायरल
Oscars 2022 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मोठा राडा झाला आहे. अभिनेता Will Smith ने सोहळ्याचा होस्ट क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली आहे, क्रिस रॉकने सोहळ्यात Will Smith च्या पत्नीवर विनोद केल्यामुळे अभिनेत्याचा पारा चढला आणि थेट स्टेजवर जाऊन त्याने क्रिसच्या कानशिलात लगावली. क्रिसने G.I. Jane सिनेमावरून विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची मस्करी केली आहे.
क्रिस म्हणाला, 'G.I. Jane सिनेमात जेडाला टक्कल असल्यामुळे घेतलं होतं. पण जेडाने सिनेमासाठी टक्कल केलं नसून, तिला एक आजार आहे. त्या आजाराचं नाव आहे Alopecia.... Alopecia मुळे केस सतत गळत असतात.
म्हणून जेडाना स्वतःचं केस कापले आहेत. दरम्यान, पत्नीवर विनोद केल्यामुळे स्मिथ चिडला आणि त्याने शिविगाळ करत होस्ट क्रिसच्या कानशिलात लगावली.
सध्या स्मिथ आणि क्रिसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिसच्या कानशिलात लगावल्यानंतर स्मिथ म्हणतो, 'माझ्या पत्नीबद्दल पुन्हा असं बोलू नकोस...' यावर क्रिस म्हणाला, 'नाही बोलणार...' सोशल मीडियावर व्हिडीओमुळे खळबळ माजली आहे.