मुंबई : सारेगमप लिटिल चॅप्स २०१७ या रिएलिटी शोनं सुमारे १० महिन्यांनंतर प्रेक्षकांची रजा घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुफान टीआरपी असलेल्या या शोमध्ये लहान मुलांचं गाण्याचं टॅलेंट थक्क करणारे होते. नुकताच राजस्थानमध्ये या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा पार पडला आहे.  अंजली गायकवाड आणि श्रेयन भट्टाचार्य या दोघांनी या शोचं विजेतेपद पटकावले आहे.  
विजेत्याची घोषणा झाल्यानंतर एका वेबसाईटला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये श्रेयन भट्टाचार्यने त्याच्या प्रवासाबाबत माहिती दिली. 
'सारेगमप'मधील दहा महिन्यांचा प्रवास खूपच खास होता. यादरम्यान अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. असे तयाने सांगितले आहे. 


सेलिब्रेशन कसे होते ? 
श्रेयन मूळचा पश्चिम बंगालचा आहे. त्याने घरी गेल्यानंतर विजयाचा आनंद सेलिब्रेट केला. त्यावेळेस घरातील सदस्यांसोबत टेरेसवर पार्टी केल्याचेही त्याने सांगितले आहे.  


भविष्यातील प्लॅन काय  ? 
श्रेयन भट्टाचार्य अजून खूप लहान आहे. त्याच्या आवाजामध्ये बदल होणार आहे. त्यानुसआर भविष्यात अधिक रियाझ करण्याचा आणि गाण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचा मानस श्रेयनने व्यक्त केला आहे. तसेच श्रेयनला भविष्यात अमिताभ बच्चन यांच्यासाठी पार्श्वगायन करण्याची इच्छा असल्याचे त्याने बोलून दाखवले आहे. बीग बी हे श्रेयनचे आवडते कलाकार आहेत. बिग बींप्रमाणेच श्रेयनला बॉलिवूडमधील नव्या फळीतील कलाकारांपैकी रणबीर कपूर आवडत असल्याचे त्याने सांगितले आहे.