मुंबईः  रणवीरच्या अभिनयशैलीवर सगळेच फिदा असतात. त्यातून त्याला नेहमीच त्याच्या फॅन्सचे कौतुक मिळाले आहे. बाजीरावपासून ते अल्लाउद्दिन खिलजी अशा भुमिकेतून सगळ्यांनीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. परंतु अनेकांना माहित नसेल की रणवीर त्याच्या एटिट्यूडसाठीही तितकाचा ओळखला जातो. रणवीरच्या अभिनेयावर जितके त्याच्या चाहत्यांनी प्रेम केले आहे तेवढीच नाराजी रणवीरच्या एटिट्यूडसाठीही चाहत्यांनी दाखवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर आणि दीपिका काही दिवसांपुर्वी परदेशी होते. ज्याचे फोटोजदेखील त्यांनी शेअर केले आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त दीपिका त्याच्यासाठी खास बेतही आखला होता. त्यांच्या इन्टाग्रामच्या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 


मध्यतंरी रणवीर आपल्या सतत गाजलेल्या चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आला होता त्याचसोबत त्याच्या आणि दीपिकाच्या चर्चांनाही विशेष उधाण आले होते. त्यामुळे सर्वत्र रणवीरचीच हवा होती. त्याचदरम्यान तो अंबानींच्या एका मोठ्या फंगशनमध्ये दिसला होता ज्यात त्याने आपल्या एटिट्यूडचा अक्षरक्षः कहर केला. 


चार वर्षांपुर्वी ईशा अंबानीचे लग्न झाले त्यावेळी हॉलीवूडसोबत बॉलीवूडचे अख्खं तारांगण आमंत्रित होते. त्याचवेळी रणवीरही त्या सोहळ्याला उपस्थित राहिला होता पण त्याचा एटिट्यूड पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले होते. रणवीरचा तोच व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. ज्यात तो रवीना टंडनच्या नवऱ्याला चक्क आगाऊपणे बाजूला व्हायला सांगतोय. 


रविनाचा नवरा जरी हा प्रकार हलक्याने घेत असला तरी रविना मात्र त्याच्यावर चांगलीच भडकता दिसते आहे. 



रणवीर सिंग आता लवकरच त्याच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातून आलिया भट्टसोबत दिसणार आहे.