मी देश तोडणाऱ्यांच्या बाजूने नाही; दीपिकाच्या JNU भेटीवर कंगनाची प्रतिक्रिया
आपण काय करत आहोत हे...
मुंबई : 'छपाक' या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या गडबडीतच अभिनेत्री दीपिका पदुकोण ही दिल्लीतील जेएनयू Jawaharlal Nehru University येथे गेली होती. विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उचलण्यात आलेलं हे तिचं पाऊल होतं.
एकिकडे दीपिकाने तिची भूमिका फार काही न बोलता फक्त कृतीच्या माध्यमातून स्पष्ट केली. तर, दुसरीकडे मात्र याचे थेट परिणाम दिसू लागले.
काही स्तरांतून दीपिकावर टीका करण्यात आली. तर, काहींनी दीपिकाची दाद दिली. तिच्या चित्रपटासाठी शुभेच्छा देत मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहावा असं आवाहनही केलं. दीपिकाच्या याच कृतीविषयी आता अभिनेत्री कंगना रानौत हिने तिची भूमिका स्पष्ट केल्याचं वृत्त 'डीएनए'ने प्रसिद्ध केलं आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये दीपिकाच्या जेएनयू भेटीविषयी कंगनाला विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, 'माझ्यामते शक्य असणाऱ्या मार्गाने तिने तिच्या लोकशाहीच्या हक्काचा अवलंब केला. आपण काय करत आहोत हे ती जाणते. त्यामुळे मी, ती काय करते यावर प्रतिक्रिया न दिलेली बरी. तिने अमुक केलं किंवा तमुक केलं असं मी म्हणणं माझ्या दृष्टीने योग्य नाही. मला काय करायचं आहे यावर मी बोलेन. (हसून) काहीही झालं तरीही मी स्वत:तरी नक्कीच असं जाऊन तुकडे तुकडे गँगच्या पाठीशी उभी राहणार नाही. देश तोडणाऱ्या, देशाचं विभाजन करणाऱ्या कोणालाही मी पाठिंबा देत नाही', असं कंगनाने स्पष्ट केलं.
वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ
जवान शहिद होतात तेव्हा त्यावर आनंद साजरा करणाऱ्यांना मी सबळ करु इच्छित नाही. मला त्यांना साथही द्यायची नाही. त्यामुळे मला काय हवं आहे यावर मी प्रतिक्रिया देईन. पण, मला तिने (दीपिकाने) जे काही केलं यावर मात्र व्यक्त व्यायचं नाही आहे अशा शब्दांत कंगनाने तिची भूमिका स्पष्ट केली.