मुंबई : काजोल तिच्या कूल स्टाइलसाठी खूप लोकप्रिय आहे. काजोल नेहमीच मोकळेपणाने बोलत असते आणि ती तिच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखली जाते. प्रत्येक मुद्द्यावर ती बेधडकपणे आपलं मत मांडते हे तुम्ही पाहिलं असेलच. आता अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मचे कौतुक करताना काजोलने एक मोठं वक्तव्य केलं, आणि म्हणाली की,  'या प्लॅटफॉर्मने अनेक कलाकारांचा खेळ बदलला आहे.' यासोबतच अभिनेत्रीने बॉलीवूडच्या शारीरिक दिसण्याच्या वेडाबद्दलही सांगितलं.
 
अशावेळी एखाद्या सेलिब्रेटीचे वजन वाढले तर लगेच त्याच्यावरती टीकास्त्र चालू होऊन जाते. प्लस साईज आणि स्किननेस या सर्वच गोष्टींचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बाऊ केला जातो. मात्र या सर्व प्रकरणामुळे अभिनेत्री हिणवल्या जातात. कधी त्यांच्या उंचीवरून कधी वाढणाऱ्या वजनावरून तर कधी खूप कमी झालेल्या वजनावरून अभिनेत्रींवर सतत टीका केली जाते. मिस युनिव्हर्स हरनाज सांधूच वाढतं वजन बघून अनेकांनी तिच्यावरती देखील टीका केली. मात्र या सर्व गोष्टींमध्ये बॉलीवूड मधील एका लिजेंडरी अभिनेत्रीने मोठं विधान केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुमचा नशीब केवळ बॉक्स ऑफिसवर अवलंबून नाहीये तर ओटीटीमुळे स्टार्ट पूर्णपणे बदललं आहे. म्हणूनच शारिरिक रूपापेक्षा देखील अभिनयाला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे,' असं म्हणणारी अभिनेत्री दूसरी कोणी नसून रोमान्स क्वीन काजोल आहे.


अलीकडेच काजोलने आपल्या गुप्त चित्रपटाची 25 वी एनिवर्सरी साजरी केली. मनीषा कोइराला आणि बॉबी देओल यांच्यासोबत गुप्त चित्रपटांमध्ये काजोलने खलनायकाचं पात्र साकारलं होतं.


या एनिवर्सरी निमित्त मुंबईमध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये चित्रपटाचे प्रमुख कलाकार आणि निर्माते राजीव राय देखील उपस्थित होते. लवकरच काजोल आता रेवती सोबत 'सलाम वेंकी' या चित्रपटात झळकणार आहे. काजोलने काही ओटीटी प्लॅटफॉर्म्स वर देखील काम केलं आहे.


त्याच पार्श्वभूमीवर मनोरंजन विश्वातील बदलत्या ट्रेंड बद्दल काजोलला विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी ती म्हणाली, 'आजकाल सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत खूप कमी वेळात पोहोचत आहेत. पूर्वी फक्त सिनेमागृह हे एकच माध्यम त्यासाठी होतं. मात्र आता ओटीटीमुळे संपूर्ण बाजूच पलटली आहे.


ओटीटी प्लॅटफॉर्म हा गेम चेंजर ठरत आहे. मनोरंजन विश्वात सकारात्मक बदल ओटीटीमुळे बघायला मिळत आहेत. चांगल्या दर्जेदार कलाकारांना काम मिळवण्यासाठी आणि आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता वाट पहावी लागत नाही. ओटीटीच्या माध्यमातून ते शक्य झालं आहे.


अनेक कलाकार आहेत जे खरोखर खूप उत्तम अभिनय करतात आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे त्यांना एक चांगला स्टेज मिळत आहे. आपल्यातल्या टॅलेंट लोकांना आपल्या पद्धतीने कुठल्याही नियमात स्वतःला बांधून न घेता दाखवता येणं, यापेक्षा एखाद्या कलाकाराला अजून काय हवं?


अगदी बॉलीवूडच्या टिपिकल 24 इंचेस कंबर आणि 36 इंच छातीच्या कुठल्याही मापदंडात न बसतात हे कलाकार आपल्या अभिनयाने चाहत्यांची मन जिंकत आहेत. मनोरंजन क्षेत्रामध्ये घडणारे हे बदल खरोखर सकारात्मक आणि जास्तीत जास्त कलाकारांना आकर्षित करणारे आहेत.' असं बोलून काजोलने बॉलीवूडच्या नियमांवर ताशेरे सोडले आहेत.