मुंबई : शाहरुख खानच्या स्वदेश या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी गायत्री जोशी आज 20 मार्च रोजी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. गायत्रीचा जन्म  20  मार्च 1977 मध्ये रोजी नागपुरामध्ये झाला. गायत्रीने तिच्या पहिल्याच चित्रपटानंतर बॉलिवूडला अलविदा केलं. आज आम्ही तुम्हाला गायत्री कुठे आहे आणि आजकाल काय करतेय हे सांगणार आहोत. गायत्रीने 1999 मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता. ती टॉप 5 मध्येही पोहोचली होती. गायत्रीने 2000 साली जपानमध्ये मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर गायत्री जोशी जगजीत सिंगच्या वो कागज की किश्ती या गाण्यात तसंच हंस राज हंसच्या झांझरिया गाण्यात दिसली. गायत्रीने अनेक ब्रँडच्या जाहिरातीही केल्या. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्वदेश या चित्रपटातून तिने लोकांचं लक्ष वेधून घेण्यात यशही मिळवलं. पण हा चित्रपट फ्लॉप ठरल्याने गायत्रीला पुढे काम मिळू शकलं नाही. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले होते. तसंच ती लवकरच पुढच्या चित्रपटात दिसणार असल्याची आशाही चाहत्यांना होती. पण ती बॉलिवूडपासून दूर गेली.  



एका वर्षानंतर गायत्री जोशीने उद्योगपती विकास ओबेरॉयशी लग्न केलं आणि चित्रपट जगताचा कायमचा निरोप घेतला. तिचे पती विकास ओबेरॉय हे रिअल ईस्टेट टायकूल म्हणूनही ओळखले जातात. ते मुंबईत रिअल इस्टेट फर्म चालवतात. गायत्री आता ओबेरॉय इंडस्ट्रीचा बिझनेसही सांभाळते. गायत्री जोशी दोन मुलांची आई असून ती आपला सगळा वेळ  कुटुंबासोबत घालवते.