मुंबई : मँचेस्टरमध्ये रविवारी पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांना त्यांच्या चाहत्या वर्गाकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकजण आपआपल्या परिने या सामन्यासाठी तयार होत असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. अखेर सामना सुरु झाला आणि निकालीही निघाला. पावसाचा व्यत्यय, भारतीय संघाने रचलेला धावांचा डोंगर या साऱ्या परिस्थितीत पाकिस्तानच्या संघाला अपयशाचा सामना करावा लागला. 


पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या भारतीय संघाचं त्यानंतर सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात आलं. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा मागे राहिले नाहीत. सलमान खानपासून ते रितेश देशमुखपर्यंत सर्वांनीच भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीची प्रशंसा केल्याचं पाहायला मिळालं. 



सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळींनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्लया भारतीय क्रिकेट संघाला शाबासकी देत त्यांचं अभिनंदन केलं. अभिनंदन हिंदुस्तान असं म्हणत रितेश देशमुखने ट्विट केलं. तर, मला असं वाटतंय की आज शेजारी (पाकिस्तानमध्ये) अनेक टीव्ही तुटणार आहेत असं ट्विट करत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी कोपरखळी मारली. 





ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही या विजयाचा आनंद व्यक्त केला. तर, दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याने त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भारत' या चित्रपटाचा संदर्भ देत या सामन्याच्या विजयानंतर त्याने एका फोटोसह भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं. 



पाकिस्तानवर विजय मिळवल्यावनंतर भारतीय क्रिकेट संघाने यंदाच्या क्रिकेट विश्वात विजय मिळवण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. त्यामुळे यंदाचा हा चषक भारतातच आणण्याच्या भारताच्या आशा आणखी पल्लवित झाल्या आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.