Worlds Richest Actor : जगातील सगळ्यात श्रीमंत कलाकारांचा विषय बोलायचं झालं तर सगळ्यांच्या डोक्यात टॉम क्रूझ, शाहरुख खान, ड्वेन जॉनसन आणि जॉनी डेप सारख्या कलाकारांची नाव येतात. हे कलाकार सगळ्यात श्रीमंत टॉप कलाकारांच्या लिस्टमध्ये आहेत. पण त्यांच्यातला कोणताच सेलिब्रिटी हा श्रीमंत नाही. जगातील सगळ्यात श्रीमंत कलाकारांमध्ये ज्याचं नाव फक्त एका हिट सीरिजशी जोडण्यात आलं आहे आणि त्यानंतर तो या सुपरस्टार्स कलाकारांच्या यादीतून पुढे निघून गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा अभिनेता कोण? तर त्या अभिनेत्याचं नाव टायलर पेरी असं आहे. टायलर पेरीचं नाव सगळ्यात श्रीमंत कलाकारांच्या यादीत टॉपला आहे. अब्जोपती असलेला टायलर पेरी हा निर्माता आणि प्ले रायटर देखील आहे. ब्लूमबर्ग, फोर्ब्सच्या रिपोर्ट्सनुसार, त्याची नेटवर्थ ही जवळपास 1.4 बिलियन डॉलर अर्थात (11,500 कोटी) आहे. हा आकडा जगातील कोणत्याही कलाकाराच्या नेटवर्थपेक्षा खूप जास्त आहे. टायलर पेरी विषयी बोलायचं झालं तर त्याला हिट कॉमेडी फ्रेंचायझी मेबल 'Madea' सिमंसच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. या सीरिजमध्ये 12 लाइव्ह अॅक्शन फिल्मे, 11 नाटकं आणि अनेक टीव्ही शो आहेत. पेरीनं या सीरिजशिवाय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टायलर पेरीच्या कमाई विषयी बोलायचं झालं तर त्याच्या कमाईचा स्त्रोत हा फक्त अभिनय नाही तर फोर्ब्सनुसार, त्यानं Madea ला क्रिएट आणि प्रोड्युस देखील केलं आहे. टायलर पेरीनं इतर चित्रपट आणि प्लेमधून 320 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. टायरल हा एकमेव असा हॉलिवूड अभिनेता आहे ज्याच्या स्वत: चा स्टुडियो आहे, ज्याचं कंटेन्ट इन-हाउस असतं. त्याशिवाय त्याचं मीडिया जॉइंट ViacomCBS सोबत एक डील आहे, ज्यात त्यांना BET+ प्लॅटफॉर्ममध्ये 60 मिलियन डॉलर म्हणजेच 500 कोटी रुपयांचा फक्त 25 टक्के भाग आहे. 


हेही वाचा : 44 व्या वर्षी पंचविशीतल्या तरुणींना लाजवणारी श्वेता तिवारी 810000000 रुपयांची मालकीण


फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये हे देखील सांगितलं आहे की टायलर पेरीकडे पैसे आणि गुंतवणूक मिळून 300 मिलियन डॉलर म्हणजेच 2,511 कोटी आहे आणि homes and toys च्या नावावर जवळपास 40 मिलियन डॉलर अर्थात 334 कोटी रुपये आहे. ही सगळी रक्कम मिळून तो जगातील सगळ्यात श्रीमंत अभिनेता आहे. 


यादीत आणखी कोणत्या सेलिब्रिटींची नावं? 


या यादीत आणखी एक हैराण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे आणि ते आहे कॉमेडियन जेरी सीनफील्ड, ज्याची एकूण संपत्ती ही 1 बिलियन डॉलर आहे. त्यासोबत तो जगातील सगळ्यात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन कलाकारांनंतर तिसऱ्या क्रमांकावर जॉनसर आहे. त्याची एकूण संपत्ती ही (890 मिलियन डॉलर) आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर ($870 मिलियन) आणि टॉम क्रुझ ($800 मिलियन) आहे.