मुंबई : अनेकदा अनेक अभिनेत्री लग्नानंतर आई झाल्यावर त्यांच्या फिटनेसमध्ये मोठा बदल होतो. या बदलामुळे या अभिनेत्री काहीशा वेगळ्या दिसतात. यात मात्र काही अभिनेत्री आपल्या फिटनेसवर भर देत पुन्हा आपलं तेचं सौदर्य आणि फिटनेस कमवतात. अशाच एका अभिनेत्रीची तुम्हाला माहिती देणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ये रिश्ता क्या कहलाता है फेम टीव्ही अभिनेत्री, डान्सर आणि कोरिओग्राफर मोहेना कुमारी हिने जबरदस्त ट्रान्स्फॉमेशन केले आहे. या अभिनेत्रीचे ट्रान्स्फॉमेशन नंतरचे फोटो पाहून चाहते शॉक झाले आहे. तसेच तिच्या फिटनेस आणि सौदर्याची तारीफ करतायत. 


अभिनेत्री मोहेना कुमारी गेल्या वर्षी प्रेग्नेट होती. तिने 16 एप्रिल रोजी एका सुंदर बाळाला जन्म दिला होता. या प्रेग्नेसीत तिचा संपुर्ण चेहरा आणि मोहरा बदलला होता. ती एक अभिनेत्री होती असे देखील अनेकांना वाटत नव्हते. मात्र आता तिने पुन्हा आपल्या फिटनेस आणि सौदर्यावर लक्ष देत ट्रान्स्फॉमेशन केले आहे. या ट्रान्स्फॉमेश व्हिडिओ देखील तिने शेअर केला आहे.  



मोहेना कुमारीने अभिनेत्री होण्यापासून ते आई होण्यापर्यंतच्या सर्वं फोटोंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या  व्हिडिओमध्ये तिने आई झाल्याची भावना अतिशय भावूकपणे व्यक्त केली आहे. या व्हिडिओत तिने तिचा अभिनय ते लग्न, गर्भधारणा आणि नंतर आई होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास अभिनेत्रीने व्हिडिओमध्ये दाखवला आहे.


टीव्ही सेलिब्रिटींनीही मोहिनाच्या या व्हिडिओवर कमेंट करून अभिनंदन केले आहे. टीव्ही अभिनेत्री लता सभरवाल यांनी कमेंट केली तिला 'लव्ह यू' म्हटलंय. तर ख्वाबों के परिंडे फेम अभिनेत्री मानसी मोघे यांनी लिहिले 'खूप सुंदर' असे कमेंट केले आहे.