मुंबई : इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होऊ लागल्या आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या वाटा अनेकांनाच खुणावू लागल्या आहेत. अशाच नव्या वाटांमध्ये गेल्या काही  दिवसांपासून रिल्स व्हिडीओंचा समावेश झाला आहे. इन्स्टाग्रामवर याची कैक उदाहरणं पाहायला मिळतात. सध्या याच रिल्समध्ये एका अभिनेत्रीनं केलेली कमाल सर्वांचंच लक्ष वेधत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओ पाहताना क्षणार्धातच या अभिनेत्रीचं रुप बदलतंय, तिचा पेहरावही बदलतोय. बरं हे सारं पापणी मिटण्यापेक्षाही कमी वेळातच शक्य होत आहे. त्यामुळं हा व्हिडीओही तितकाच व्हायरल होत आहे. 


अफलातून व्हिडीओतून काहीतरी हटके करत चर्चेत येणारी ही अभिनेत्री आहे 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मध्ये सीरत हे पात्र साकारणारी शिवांगी जोशी. 




डान्स करता-करता शिवांगी तिचा लूक नेमका कसा बदलते हे पाहताना तंत्रज्ञानाची प्रशंसा केली जाण्यासोबतच शिवांगीच्या अंदाजाचीही प्रशंसा चाहते करत आहेत. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. ज्यामुळं तो अतिशय झपाट्यानं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.