मुंबई : झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका सध्या तुफान लोकप्रिय होत आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओम या जोडीने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. ही मालिका सध्या चर्चेत आहे. कारण मालिकेतील ओम आणि स्विटु खऱ्या अर्थाने एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. तर दोघांनीही एकमेंकांवरचं प्रेम व्यक्त केलं आहे. स्विटुने एअरपोर्टवर सगळ्यांसमोर ओमला प्रपोझही केलं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेमुळे ओम आणि स्वीटूचा खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला असून हे सर्व चाहते या दोघांना सोशल मीडियावर देखील फॉलो करतात. मालिकेप्रमाणेच सोशल मीडियावर देखील ओम आणि स्वीटूची जोडी सुपरहिट आहे. नुकतंच स्वीटू म्हणजेच अन्विताने तिचा आणि शाल्वचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि चाहत्यांना या फोटोला कॅप्शन द्या असं म्हंटल. त्या दोघांच्या या फोटोवर चाहत्यांनी कॅप्शनचा अक्षरशः वर्षाव केला आहे.



त्यावरूनच या जोडीच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. मालिकेत सध्या प्रेक्षक ओम आणि स्वीटूच्या प्रेमाची गाडी पुढे सरकताना पाहत आहेत. तेव्हा आता मालिकेत ओम आणि स्विटुच्या लग्नाचा मुहुर्त कधी निघणार अशी उत्सुकता प्रेक्षकांना आहे. ओम आणि स्विटु घरच्यांना त्यांचं प्रेम पटवून देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.