मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा इंडस्ट्रीतला एक टॉपचा अॅक्टर आहे. बाजीराव मस्तानी, पद्मावत, गली बॉय, दिल धडकने दो, गुंडे आणि लुटेरा यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:च नाव निर्माण केले आहे. मात्र ज्यावेळेस त्याने करीयरची सुरुवात केली, त्यावेळेस त्याला अनेक वाईट अनुभवांना सामोर जावे लागले होते. यातलाच एक अनुभव म्हणजे, रणवीर सिंहला एका चित्रपट निर्मात्याने डिवचलं होत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2010 मध्ये, रणवीर सिंगचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला ज्याचे नाव होते बँड बाजा बारात. या चित्रपटात रणवीरची जोडी अनुष्का शर्मासोबत होती. चित्रपटाची कथा खूपच वेगळी होती, त्यामुळे तो खूप हिट झाला. या चित्रपटाचा निर्माता असलेल्या आदित्य चोप्राने रणवीरला कास्ट करताना खास सल्ला दिला होता. 'तु ऋतिक रोशन नाही आहेस, तर अ‍ॅक्टींग व्यवस्ठित कर'
तसेच 'तु चांगला दिसतोस पण तुझ्यावर पैसे लावता येणार नाही' असा सल्ला दिला होता. निर्मात्याचे असा सल्ला ऐकून रणवीर स्तब्ध झाला होता.  


निर्मात्याच्या या सल्ल्यानंतर त्या क्षणापासून रणवीर सिंगने स्वत:ला सिद्ध करायला सुरुवात केली. १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अशा अनेक भूमिका साकारल्या या खुप उत्कृष्ट ठरल्या. पद्मावतचा खिलजी असो की राम लीलामधला राम असो, दिल धडकने दोचा कबीर मेहरा असो की बाजीराव मस्तानीचा पेशवा बाजीराव असो. या पात्रांमुळे रणवीर सिंह स्टार म्हणून उद्यास आला. त्याचे सध्या अनेक चित्रपट आता प्रदर्शित होणार आहेत.