मुंबई : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म मनोरंजनाचं सर्वात मोठं साधन बनलं आहे. अनेकजण मनोरंजनासाठी नवीन वेबसीरीजच्या शोधात असतात. तर काहीजण फ्रेण्डससोबत तर काही कुटुंबासोबत सिनेमा पाहण्याचा प्लान करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण काही सीरीजमध्ये  बोल्ड सीन दाखवण्यात येतात, त्यामुळे सगळ्यांसोबत ते पाहता येत नाहीत.


आजकाल OTT प्लॅटफॉर्मवर अनेक बोल्ड वेबसीरिज रिलीज होत आहेत. वेबसीरीजमध्ये आता बोल्ड सीन्स दाखवण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यात एक नाव नेहमी चर्चेत असते. ते म्हणजे आयशा कपूर हिचं... 


अनेक बोल्ड सीन्स देत तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. तिच्या व्हायरल होत असलेल्या इंटिमेट सीन्सची सर्वत्र चर्चा आहे.


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या झोल या वेबसीरीजची सगळीकडे हवा आहे. आयशा कपूरने या सीरीजमध्ये बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. या वेबसीरिजमध्ये तिने हॉट सीन्स दिले आहेत. कुटुंबासोबत पाहत येणार नाही अशा पद्धतीची चर्चा या वेबसीरीजबाबत होत आहे



खरं तर या मालिकेत अगदी विचित्र कथा दाखवण्यात आली आहे. या मालिकेत एका जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे, जो आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराकडे सोपवतो, कारण त्याची पत्नी त्याच्यावर नव्हे तर तिच्या प्रियकरावर खूप प्रेम करते.


चित्रपटात बोल्डनेसच्या मर्यादा पार करणारी आयशा कपूरने 2016 साली मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सध्या ती तिच्या नवीन मालिकेमुळे चर्चेत आहे. याआधीही ती अनेक बोल्ड वेब सीरिजमध्ये दिसली आहे.