प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली, माझा प्रायव्हेट पार्ट...
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने एकच खळबळ...
मुंबई : हॉलिवूड रिएलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन तिच्या नवीन बॉयफ्रेंड पीट डेविडसनला तिच्या शोमध्ये घेत आहे. 41 वर्षीय किम तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या जीवनावर आधारित रिअॅलिटी शो 'द कार्दशियन्स'मध्ये दिसते. या शोचा पहिला सीझन नुकताच संपला आहे. अशा परिस्थितीत शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये तिचा बॉयफ्रेंड पीट दिसणार असल्याचे संकेत किम कार्दशियनने दिले आहेत.
किम तिच्या प्रायव्हेट पार्टबद्दल विनोद करते
पीट डेविडसनवला रिअॅलिटी शो 'द कार्दशियन्स'च्या फिनालेमध्ये कॅमेऱ्याच्या मागे बोलताना ऐकलं. या एपिसोडमध्ये किमला पोस्ट क्रेडिट सीनमध्ये पाहिलं गेलं. या सीनमध्ये किम पीटला तिच्या क्रू मेंबर पॅक्सीला भेटण्यासाठी बोलावते. यासोबतच ती तिच्या प्रायव्हेट पार्टची खिल्ली उडवतानाही दिसली आहे.
व्हिडिओमध्ये किम बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनला म्हणते, 'इकडे ये, तुला पॅक्सीला भेटायचं आहे. पॅक्सीने माझ्यासोबत कीपिंग अप विथ द कार्दशियन्सवर 14 वर्षे ऑडिओ म्हणून काम केलं आहे. त्याला माझ्याबद्दल सगळं काही माहित आहे. किम पुढे म्हणाली, 'त्याने माझा प्रायव्हेट पार्टही पाहिला असेल.' यावर पीट म्हणतो, 'माझ्यापेक्षा अधिक.' तेव्हा किम स्पष्टीकरण देत म्हणते, 'नाही, तुमच्यापेक्षा जास्त नाही, पण कदाचित त्यानी ते पाहिलं असेल.'
किम आणि पीट यांच्यातील संभाषण ऐकताच पॅक्सी हसतो. 'मी तिचा प्रायव्हेट पार्ट पाहिला नाही. मी सुरुवातही केलेली नाही. यावर किम उत्तर देते आणि म्हणते की, 'माझे खाजगी पार्ट पाहण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करण्याची वेळ आली आहे. ते तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता. मी फक्त मस्करी करतेय.
असं मानलं जात आहे की, रिअॅलिटी शो द कार्दशियन्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये पीट डेव्हिडसन प्रवेश करू शकतो. किमच्या कुटुंबीयांनी पीटला पसंती दिली आहे. किमची बहीण क्लो हिनेही शोमध्ये पीटचं कौतुक केलं. त्याच्यामुळे किमचं आयुष्य ड्रामापासून दूर आणि सोपं झालं आहे. ही चांगली गोष्ट आहे.