Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेनं गेल्या 14 वर्षांपासून चाहत्यांना भुरळ पाडली. टि.व्ही वरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक अशी तिची ओळख. पण, सध्या मात्र या मालिकेसाठी चांगला काळ दिसत नाही. काही महिन्यांपूर्वीच 'तारक मेहता' (Taarak Mehta) ही भूमिका साकारणारे 'शैलेश लोढा' (Shailesh Lodha) यांनी मालिकेचा निरोप घेतला. त्यांच्या जागी 'सचिन श्रॉफ' (Sachin Shroff) यांची निवड 'तारक मेहता' या भूमिकेसाठी करण्यात आली. (You will be shocked to hear Shailesh Lodha answer when asked why left the show NZ)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतके दिवस लोढा यांनी मालिका (Serial) सोडण्यामागे काय कारण आहे हे सांगितलं नव्हतं. पण हल्लीच त्यांना या प्रश्नाचं उत्तर देताना नाराजी व्यक्त केली. शैलेश लोढा यांनी आळवलेला सूर नेटकरी आणि चाहत्यांना धक्काच देऊन गेला. 


प्रसिद्धीच्या उत्तुंग शिखरावर असणाऱ्या मालिकेतून एकाएकी लोढा यांनी काढता पाय घेणं चाहत्यांसाठीही धक्का होता. इतकं सगळं होऊनही त्यांनी मौन बाळगलं होतं. पण, अखेर सततचा प्रश्नांचा भडीमार पराकोटीस पोहोचला आणि लोढा यांनी उत्तर दिलंच. 



आणखी वाचा... भिडे मास्तरांच्या सोनूने घेतलं घर... मोजावी लागली मोठी किंमत


मुंबई विमानतळावर ज्यावेळी त्यांना माध्यमांत्या प्रतिनिधींनी घेरलं (Mumbai Airport) तेव्हा एक रिपोर्टर (Reporter) म्हाणाला, 'सर आम्ही तुम्हाला खूप मिस (Miss) करतोय' तेव्हा त्याच्या प्रश्नावर शैलेश लोढा म्हाणाले की, 'कुछ तो मजबूरीयाँ रही होगी.. यूँ कोई बेवफा नहीं होता...'. लोढा सांकेतिक अंदाजात खूप काही सांगून गेले. 


दरम्यान, अजूनही त्यांनी मालिका का सोडली हे कारण समोर आलेलं नाही. पण त्यांच्या वक्तव्यानं निर्मात्यांवर लोढा यांची स्पष्ट नाराजी असल्याचं कळत आहे. आता येत्या दिवसांत लोढा यांची नेमकी काय भूमिका असेल किंवा ते कोणत्या नवीन प्रोजेक्टसमधून (Project's) चाहत्यांचं मनोरंजन (Entertainment) करणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.


आणखी वाचा... इंडस्ट्रीला घायाळ करणाऱ्या 'हिचं' इन्स्पिरेशन आहे चक्क मांजर, ही अभिनेत्री आहे तरी कोण