मुंबई : टीव्ही विश्वातील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडल 12 (Indian Idol 12) दर्शकांच्या पसंतीस पडत आहे. शोमध्ये असलेले स्पर्धक आणि त्यांच्यात असलेल्या कलागुणांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.  एखाद्या गाण्यावर त्यांनी केलेली मेहनत त्यांच्या सादरीकरणातून स्पष्टपणे झळकते. या स्पर्धकांनी दर्शकांच्या मनावर त्यांच्या गोड आवाजाने तर घावचं केला आहे. तर आदित्य नारायण देखील शोमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर शोमधील स्पर्धक नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया देखील चर्चेत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता या मोठ्या शोचे परीक्षक एका वेगळ्या कारणामु्ळे चर्चेत आले आहेत. चर्चा होत आहे, ती म्हणजे परीक्षकांच्या मनधनाबाबत. शोमध्ये सर्वात जास्त मानधन स्वीकारणार परीक्षक म्हणजे गायक नेहा कक्कर. त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे  विशाल आणि त्यांच्या नंतर लागतो तो म्हणजे गायक हिमेश रेशमिया. 


तर नेहा कक्कर एका एपिसोडसाठी तब्बल 5 लाख रूपये मानधन स्वीकारते. तर विशाल एका एपिसोडसाठी तब्बल 5 लाक रूपये मानधन स्वीकारत असून हिमेश 4.5 लाख मानधन घेतो. तर होस्ट आदित्य नारायण एका एपिसोडसाठी 2.5 लाख रूपये मानधन स्वीकारतो. 


दरम्यान, शोच्या स्पर्धाकांच्या चर्चतर सोशल मीडियावर तुफान रंगत असते. अरूणिता कांजीलाल,  पवनदीप राजन, सवाई भट्ट आणि अन्य  स्पर्धक त्यांच्या आवाजाने संपूर्ण वातावरण संगीतमय करतात. अरूणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांची जोडी तर अत्यंत खास आहे.