Video : यूट्यूबर Armaan Malik तिसऱ्या पत्नीला घरी घेऊन आला; सवतीला पाहताच दोन्ही पत्नींनी...
Armaan Malik च्या लेकानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अरमानच्या तिसऱ्या पत्नीला पाहताच पायल आणि कृतिकानं कशा प्रकारे रिअॅक्ट केलं ते पाहायला मिळत आहे.
Youtuber Armaan Malik Got Married For Third Time : यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा काही दिवसांपूर्वी त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला होता. अरमान मलिकचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तो एक युट्यूबर असून त्याचे लाखो चाहते आहेत. अरमान मलिकने दोन लग्न केली आहेत. अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. अरमान त्याच्या पत्नींसोबतचे व्लॉग आणि व्हिडीओ युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अरमाननं त्याच्या दोन्ही पत्नी या प्रेग्नंट असल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती.
अरमाननं आता पुन्हा एकदा लग्न केलं आहे. अरमाननं त्याची तिसरी पत्नी घरी आणली आहे. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. अरमानचा हा व्हिडीओ चिरायू पायल मलिकनं त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अरमान घरी दोन पत्नी असताना तिसरी पत्नी घेऊन आल्याचे दिसत आहे. अरमानच्या तिसऱ्या पत्नीला पाहून त्याच्या दोन्ही पत्नी म्हणजे पायल (Payal Malik) आणि कृतिका (Kritika Malik) या संतापतात.
पाहा व्हिडीओ -
अरमान मलिकच्या तिसऱ्या पत्नीला पाहून कृतिका आणि पायलला खूप राग येतो. त्या दोघींना मोठा धक्का बसतो. पायल अरमानच्या तिसर्या पत्नीला चप्पलनं मारेन असं बोलते. कृतिकाही अरमानला नीच वगैरे बोलून त्याचा अपमान करते. पायल आणि कृतिका अरमान आणि त्याच्या तिसऱ्या पत्नीला खूप वाईट बोलतात इतक्यात पायलची तब्येत बिघडते. हे पाहताच रडत रडत कृतिका अरमानला तिसऱ्या पत्नीसोबत घर सोडून जाण्यास सांगते. त्यानंतर बोलते की आम्ही मुलांना सांभाळून घेऊ तू जा. पायला त्रास होत असल्याचे पाहून अखेर अरमान त्या दोघींना सत्य सांगतो आणि बोलतो की हा एक प्रँक होता. मग तो पायल आणि कृतिकाला मिठी मारतो.
हेही वाचा : Rakhi Sawant वर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर, आईच्या लग्नानंतर आदिलनंही सोडलं? Video समोर
दरम्यान, अरमानच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका या प्रेग्नंट आहेत. दोघी एकत्र प्रेग्नंट असल्यानं पायल, कृतिका या दोघींसोबत अरमानसा ट्रोल केले. त्यानंतर त्यानं खुलासा केला की कृतिका नॅचुरली प्रेग्नंट आहे तर पायल IVF च्या मदतीनं प्रेग्नंट आहे. अरमानन आणि पायलला एक मुलगा आहे.
कोण आहे अरमान मलिक?
अरमान मलिक एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. अरमान युट्यूब (YouTube) आणि इंस्टाग्रामवर (Instagram) मनोरंजक व्हिडिओ शेअर करत असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरमान मलिकने 2011 मध्ये पायलसोबत लग्न केले. त्यानंतर 2018 मध्ये पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकासोबत लग्न केले. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो.