Youtuber Armaan Malik's Two Wife Fight :  यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik)  हा काही दिवसांपूर्वी त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला होता. अरमान मलिकचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तो एक युट्यूबर असून त्याचे लाखो चाहते आहेत. अरमान मलिकने दोन लग्न केली आहेत. अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. अरमान त्याच्या पत्नींसोबतचे व्लॉग आणि व्हिडीओ युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अरमाननं त्याच्या दोन्ही पत्नी या प्रेग्नंट असल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती. दरम्यान, अरमानच्या घरी दोन नाही तर तीन पाहुणे येणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या सगळ्यात अरमानच्या दोन्ही पत्नी पायल (Payal Malik) आणि कृतिका (Kritika Malik) यांच्यात व्हॅलेंटाईन गिफ्टवरून (Valentine's Day gift) वाद सुरु झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अरमान मलिक पायलला चॉकलेटचा बॉक्स आणि कृतिकाला नवीन आयफोन 14 भेट देत व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसत आहे. पायलला मिठाई आवडत नाही, पण अरमानच्या आनंदासाठी तिने हसतमुखाने हे गिफ्ट स्वीकारले. पण एकदा पायलच्या लक्षात आले की कृतिकाला अरमानकडून नवीन आयफोन मिळाला आहे, तेव्हा ती अरमानशी भांडू लागली. पायलने अरमानला विचारले की तो फोन तिला भेट म्हणून का दिला नाही? तर दुसरीकडे, कृतिका नवीन फोनविषयी खूप आनंदी असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर पायल आणि कृतिकामध्ये फोनवरून वाद झाला आहे. पायल अरमानला सांगते की हे गिफ्ट तू परत कर. हे ऐकताच कृतिकाला राग येतो. यावेळी पायल बोलते की इसको आयफोन और मुझें चॉकलेट? 


हेही वाचा : यूट्यूबर Armaan Malik तिसऱ्या पत्नीला घरी घेऊन आला; सवतीला पाहताच दोन्ही पत्नींनी...



कोण आहे अरमान मलिक?


अरमान मलिक एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. अरमान युट्यूब (YouTube) आणि इंस्टाग्रामवर (Instagram) मनोरंजक व्हिडिओ शेअर करत असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरमान मलिकने 2011 मध्ये पायलसोबत लग्न केले. त्यानंतर 2018 मध्ये पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकासोबत लग्न केले. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो.