Youtuber Armaan Malik's  Second Wife Kritika Became Mother : गेल्या अनेक दिवसांपासून यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अरमान मलिकच्या दोन पत्नी असून त्या दोघी एकाचवेळी प्रेग्नंट राहिल्या. दरम्यान, अरमाननं आता त्याच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकनं (Kritika Malik) नुकतंच बाळाला जन्मला दिला आहे. याविषयी अरमाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. मात्र, त्यांना मुलगा झाला की मुलगी हे अरमाननं सांगितलं नाही. तर त्यानं प्रेक्षकांना स्वत: ओळखायला सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूट्युबर अरमान मलिकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्यटे अरमाननं सुरुवातीला कृतिका, पायल आणि त्याच्या मुलासोबत फोटो शेअर केला आहे. दरम्यान अरमाननं तब्बल 10 फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये अरमानच्या मुलानं त्याच्या हातात मुलीची सॅन्डल धरली आहे. तर अरमाननं कृतिकासोबतचा दुसरा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अरमाननं मुलाचे बूट धरले आहेत. हे फोटो शेअर करत अरमाननं कॅप्शन दिलं की 'अखेर गोलू आई झाली. तुम्ही ओळखू शकता मुलगा आहे की मुलगी? किंवा मग दोघे तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादानं ठीक आहेत.' 



दरम्यान, अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नी पलक आणि कृतिकाचे चाहते त्यांच्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, संध्याकाळी 5 वाजता मुलगा झाला की मुलगी किंवा मग दोन्ही झाले याविषयी ते त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहेत. त्याचा एक व्लॉग हे लवकरच सोशल मीडियावर शेअर करणार आहेत, असं त्याची पहिली पत्नी पायलनं (Payal Malik) तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्टोरी शेअर करत खुलासा केला. 


हेही वाचा : Dasara vs Bholaa Box Office Collection : 'दसरा'चा 'भोला'ला बॉक्स ऑफिसवर धोबीपछाड


दरम्यान, अरमानच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत त्यांना सगळ्यांना नवीन पाहुण्याच्या आगमनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'माझ्या आवडत्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या बाळाला पाहण्यासाठी मी खूप उत्साही आहे. मुलगी असली पाहिजे अशी मी आशा करते.' दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मुलगी झाली आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुमच्या घरी लक्ष्मी आली खूप खूप शुभेच्छा.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'दोघेही सुखरुप असले पाहिजे हीच अपेक्षा आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुमच्या मुलांना पाहण्यासाठी उस्तुक आहे.'