Sonakshi Sinha Zaheer Iqbal Marriage: बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत असून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांच्या लग्नाची चर्चा आहे. दोघेही या महिन्यात विवाहबद्ध होणार आहेत. दरम्यान आंतरधर्मीय विवाह असल्याने सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर धर्मांतर (Convert) करत इस्लाम (Islam) धर्म स्विकारणार का? याबद्दलही चर्चा आहे. झहीर इक्बालचे वडील इक्बाल रत्नासी यांनी मात्र हे सगळे रिपोर्ट फेटाळले आहेत. Free Press Journal शी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं आहे की, "लग्नात ना हिंदू पद्धती असतील ना मुस्लीम. हे फक्त एक साधं लग्न असेल".


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, "ती धर्मांतर करणार नाही एवढं मात्र नक्की आहे. हे फक्त मनांचं मिलन असून यामध्ये धर्माची काही भूमिका नसेल. मी माणुसकीवर विश्वास ठेवतो. देवाला हिंदू भगवान आणि मुस्लीम अल्लाह म्हणतात. पण दिवसाच्या शेवटी आपण सर्वजण माणसं आहोत. झहीर आणि सोनाक्षी यांच्यासोबत आमच्या शुभेच्छा आहे".


अलीकडेच, अभिनेत्रीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचे जवळचे मित्र शशी रंजन यांनी लग्नाबद्दल माहिती दिली होती. ETimes ला त्यांनी सांगितलं की, "तिचे (सोनाक्षी) ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी तिचे लग्न होत आहे. सर्वजण यात सहभागी होत आहेत, लग्नासाठी शत्रुजींचे भाऊही अमेरिकेतून येत आहेत. नोंदणीकृत विवाह झहीर इक्बालच्या घरी होणार आहे. माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे."


काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नात उपस्थिती लावणार असल्याचं सांगितलं होतं. झूमला दिलेल्या मुलाखतीत, ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी यांनी आपण लग्नाला उपस्थित नसणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचं सांगितलं होतं. "मला सांगा, हे नेमकं कोणाचं आयुष्य आहे? माझी एकुलती एक मुलगी सोनाक्षीचं आयुष्य आहे, जिचा मला खूप अभिमान आहे आणि माझी फार लाडक आहे. ती मला तिच्या शक्तीचा आधारस्तंभ म्हणते. मी लग्नाला उपस्थित राहणार आहे. नक्कीच मी जाणार आहे आणि का जाऊ नये?," अशी विचारणाही त्यांनी केली होती. 


पुढे ते म्हणाले होते की, "मी अजूनही मुंबईत आहे ही वस्तुस्थिती दर्शवते की मी येथे फक्त तिचा आधारस्तंभ म्हणून नाही तर तिचा खरा कवच (कवच) म्हणूनही आहे. सोनाक्षी आणि झहीर यांना एकत्र आयुष्य जगायचे आहे. ते एकत्र खूप छान दिसतात".


सोनाक्षी आणि झहीर 2020 पासून डेटिंग करत असल्याची माहिती आहे. त्यांनी 2022 मध्ये आलेल्या डबल XL चित्रपटात एकत्र काम केलं होतं. गेल्या वर्षी ही जोडी ब्लॉकबस्टर या म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली होती.