Zarina Wahab on Aditya Pancholi and Kangana Ranaut Affair : बॉलिवूड अभिनेत्री झरीना वहाब आणि अभिनेता आदित्य पांचोली यांच्या लग्नाची चर्चा आजही होती. झरीना वहाब सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. ज्यात त्यांनी जिया खान यांच्या आत्महत्येपासून मुलगा सूरज पांचोलीच्या बुडालेल्या करिअर ते नवरा आदित्य पांचोलीविषयी असलेल्या अनेक वादांवर वक्तव्य केलं आहे. सूरज पांचोलीनं 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हीरो' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दरम्यान, झरीना वहाब यांनी सांगितलं की त्यांच्या आणि आदित्यच्या लग्नानंतर त्या आदित्याच्या विवाहबाह्य संबंधासाठी तयार होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लहरें रेट्रो'ला दिलेल्या एका मुलाखतीत झरीनानं सांगितलं की 'मला कायम आदित्यच्या विवाहबाह्य संबंधांविषयी माहित होतं. पण मी कधीच त्याला प्रश्न विचारले नाही. माझ्यावर जर कोणत्या गोष्टीचा परिणाम होत असेल तर तो म्हणजे घरी आल्यानंतर तो मला कशी वागणूक देतो. त्यामुळे मी त्याला कधीच प्रश्न विचारत नव्हते कारण त्यामुळे तो न घाबरता राहत होता. मी त्याच्या अफेयर्सला घेऊन आधीपासून तयार होते.'


त्यानंतर झरीना यांना विचारण्यात आलं की 'जेव्हा पूजा बेदी आणि कंगना रणौतनं आदित्यवर आरोप करण्यात आले. तेव्हा झरीनाला काय वाटलं होतं यावर उत्तर देत त्या म्हणाल्या, तो कधीच अब्युसिव्ह नवरा नव्हताच. उलट मी त्याला मारण्याची शक्यता होतील. त्याच्या गर्लफ्रेंडनं त्यांच्यावर आरोप केले कारण त्यांना ते मिळालं नाही ज्याची त्यांना अपेक्षा होती.'


पुढे कंगना रणौतचा उल्लेख करत झरीना म्हणाली, 'मी कंगनासोबत कायम राहिले. ती अनेकदा माझ्या घरी यायची आणि आदित्य देखील तिच्यासोबत व्यवस्थित राहायचा. पण सगळ्या गोष्टी कधी खराब झाल्या कळलं नाही.'


हेही वाचा : VIDEO : ऐश्वर्यानं फोनच्या वॉलपेपरवर ठेवलाय आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो?


अखेर झरीना आदित्य पांचोलीविषयी बोलताना म्हणाली, 'आदित्य एक चांगला नवरा आहे आणि चांगला वडील. त्यानं कधीच मला कोणत्या गोष्टीसाठी अडवलं नाही मग तो चित्रपट असो किंवा मग कुठे फिरायला जायचं असो.' दरम्यान, आदित्य आणि झरीना यांची भेट ही कलंक का टीका या चित्रपटाच्या वेळी झाली होती. झरीना या आदित्य पेक्षा वयानं 6 वर्ष मोठ्या आहेत. झरीनाची आई या नात्याच्या विरोधात होत्या. 1986 मध्ये त्यांनी लग्न केलं.