झीनत अमान- संजय खान यांच्या अफेअरवर Zayed Khan नं सोडलं मौन, `हे प्रत्येक अभिनेत्याच्या घरात...`
Zeenat-Sanjay Affair : 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान आणि अभिनेता संजय खान यांचं अफेयर होतं. त्यांनी गुपचूप लग्न केलं होतं अशी मीडियामध्ये चर्चा रंगली होती. आज अनेक वर्षांनंतर संजय खानचा मुलगा ज़ायेद खानने खुलासा केलाय.
Zayed Khan On Zeenat-Sanjay Affair : बॉलिवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्रीचे अफेयर हे काही नवीन नाही. 80 च्या दशकात लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान आणि अभिनेता संजय खान यांच्यातील अफेयरची खूप चर्चा रंगली होती. त्यांच्या सिझलिंग रोमान्सने त्या काळात अनेक हेडलाइन गाजल्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार संजय यांनी एकदा हॉटेलच्या लॉबीमध्ये झीनतला मारहाण केली होती. ज्यामध्ये झीनत यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतरच त्यांचं नातं तुटलं होतं. याच दरम्यान संजय खान यांनी झरीन खानसोबत लग्न केलं होतं. पण असं म्हणतात की संजय खान यांनी झीनत अमानशी गुपचूप लग्न केलं होतं असं म्हटलं जातं. आजपर्यंत यामागील सत्य काय आहे, याचा खुलासा अनेक वर्षांनी संजय खान यांच्या मुलगा आणि अभिनेता ज़ायेद खानने केलाय. (Zayed Khan breaks silence on Zeenat Aman Sanjay Khan affair Its in every actors house)
'हे प्रत्येक अभिनेत्याच्या घरात...'
झूमला दिलेल्या मुलाखतीत ज़ायेद खानला त्याच्या वडिलांच्या झीनत अमानसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला की, 'हे फक्त माझ्या वडिलांच्या घरी घडत नव्हतं, तर प्रत्येक अभिनेत्याच्या घरी हे घडत होते. एक-दोन विचित्र लोक वगळता प्रत्येक व्यक्ती अतिशय विक्षिप्त होता...मी लहान असताना, या लोकांना जैज़ी वर्साचे शर्ट, यांची पार्टी आणि तयार होताना पाहिलंय. तो एक वेगळा काळ होता. ती रिअर पर्सनॅलिटी होती.'
हेसुद्धा वाचा - PHOTO : पायलट पतीला घटस्फोट, धर्म बदलून अभिनेत्याशी लग्न; टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होताच सोडली इंडस्ट्री
कसं होतं झीनत अमान आणि संजय खान यांचं नातं?
झीनत अमान त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्री होत्या. संजय खान यांनी सार्वजनिक ठिकाणी झीनत अमान यांना थप्पड मारल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता. त्यामुळे अभिनेत्रीच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली होती. अब्दुल्ला या चित्रपटात एकत्र काम करताना झीनत अमान आणि संजय खान प्रेमात पडले होते. 1978 मध्ये राजस्थानच्या जैसलमेरमध्ये दोघांनी केवळ दोन साक्षीदारांसोबत गुपचूप लग्न केले. मात्र त्यांचं लग्न एका वर्षातच संपलं आणि ते दुःखदायक लग्न ठरलं.
मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवल्यास संजय खान त्याची पहिली पत्नी जरीन कात्रकसोबत हॉटेल ताजमध्ये पार्टी करत असताना झीनत या चित्रपटाच्या तारखेबाबतचा वाद मिटवण्यासाठी तिथे आल्या होत्या, तेव्हा झीनत यांना पाहून संजय यांना धक्काच बसला होता. त्यांनी तिला एका खोलीत नेले जेथे त्यांनी अभिनेत्रीला बेदम मारहाण केली असं म्हटलं जातं. एका सूत्रानुसार, अभिनेत्याने झीनत यांचे केस ओढले आणि अभिनेत्रीला ठोसा मारला, ज्यामुळे झीनत यांच्या एका डोळ्याला कायमचं नुकसान झालं होतं. ही भीतीदायक घटना त्यावेळी मित्र आणि कुटुंबीयांनी पाहिली होती.
तर संजय खान यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. हृषिकेश कन्ननसोबतच्या पॉडकास्टमध्ये संजय यांनी सांगितले होतं की, त्यांनी अभिनेत्रीला कधीच कानशिलात मारली नव्हती. त्यांनी आपल्या विरोधात 'पीआर स्टंट' म्हटलंय होतं. झीनत यांची दुखापत आनुवंशिक असल्याचेही त्यांनी सांगितलंय.