Zayed Khan Net Worth: शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सुष्मिता सेनसोबत (Sushmita Sen) मोठ्या परद्यावर झळकलेला हा चिमुकला प्रसिद्ध अभिनेता संजय खान यांचा मुलगा आहे ज़ायेद खान. आज त्याचा 44 वा वाढदिवस असून तो फिल्मी दुनियापासून कोसो दूर आहे. काही हिट चित्रपटात काम करुनही त्याच फिल्म करिअर फार चांगल नव्हतं. तरी तो आज लक्झरी आयुष्य कसं जगतोय असा प्रश्न चाहत्यांना पडतो. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2003 मधील चुरा लिया है तुमने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घतेली. त्यानंतर 2005 मध्ये मैं हूं ना या चित्रपटातून त्याला खास ओळख मिळाली. शाहरुख खान, सुष्मिता सेन आणि अमृता राव यांच्यासोबत त्याने स्क्रीन शेअर केली होती. 'दस', 'वादा', 'युवराज', 'शब्द', 'फाईट क्लब', 'रॉकी', 'तेज', 'अंजाना अंजानी' हे बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटामुळे त्याने बॉलिवूडला राम राम ठोकलं. 


त्यानंतर त्यांने फ्री एंटरटेनमेंटची निर्मिती कंपनीमध्ये आपलं भाग्य आजमावयाचं ठरवलं. या कंपनीच्या माध्यमातून त्याने दिया मिर्झासोबत लव्ह ब्रेकअप जिंदगी बनवला. तोही फार जादू करु शकला नाही. मग ही कंपनी दुसऱ्या कंपनीच्या सहकार्याने पैसे गुंतवून सुरु आहे. 



मीडिया रिपोर्ट्सनुसार जायेद खान लक्झरी आयुष्य जगण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. शिवाय त्याचा स्वत:चा व्यवसायही आहे. त्याची एकूण संपत्ती ही 15 अब्ज रुपये म्हणजे अंदाजे 1500 कोटींच्या घरात आहे. खरं तर त्याच्या संपत्तीचा आकडा हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे.