मुंबई : मुंबई : झी मराठी अवॉर्ड्स २०२०-२१ हा पुरस्कार सोहळा मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला मराठी मनोरंजन क्षेत्रातले कलाकार उपस्थित होते.. या कार्यक्रमाची आतुरता प्रेक्षकांबरोबरच या कलाकारांनाही असते. यंदाही अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा पार पडला. यावेळी कलाकारांचे अत्यंत मनोरंजक असे सादरीकरण, विनोदी स्किटस् यामुळे या कार्यक्रमाला चारचाँद लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नजर टाकुयात झी मराठी अवॉर्ड्स पुरस्कारांवर
माझा होशील ना या मालिकेतील 'सई- आदित्य' यांना 'सर्वोत्कृष्ट जोडी'चा मान मिळाला, तर 'माझा होशील ना' ही  मालिका 'सर्वोत्कृष्ट मालिका' ठरली, सर्वोत्कृष्ट कुटुंब ब्रम्हे कुटुंब, 'सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा' कलाकार महिला देवमाणुस मालिकेतील 'सरु आजी' ठरली तर, 'सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरे'खा कलाकार पुरुष विभागात 'टोण्या'ला पुरस्कार मिळाला... 'सर्वोत्कृष्ट खलनायिका' 'मालविका' येवू कशी तशी मी नांदायला. तर 'लक्स गोल्डन' हा विशेष पुरस्कार येवु कशी तशी मी नांदायला मालिकेती स्वीटूला  मिळाला.. तर सर्वोकृष्ट आईचा मान मिळाला 'येवु कशी तशी मी नांदायला' मालिकेतील शकूला. तर सर्वोकृष्ट सासरे ठरले 'माझा होशील ना' मालिकेतील ब्रम्हे मामा


झी मराठी वाहिनीवरून प्रसारीत होणा-या 'माझा होशील ना', 'येऊ कशी तशी मी नांदायला', 'देवमाणूस', 'अग्गबाई सासूबाई', 'काय घडलं त्या रात्री?', 'कारभारी लाईभारी', 'लाडाची मी लेक ग!' या मालिकांमध्ये जोरदार चुरस होती. मराठी मनोरंजन विश्वातील तारे-तारकांच्या उपस्थितीत रंगलेल्या या कार्यक्रमाचे प्रसारण २८ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल