Zee Marathi Award 2024 : कोणताही पुरस्कार सोहळा म्हटलं की तो कलाकारांसाठी खास असतो. त्याचं कारण म्हणजे त्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळते. अर्थात त्या आधी नामांकन मिळणं देखील महत्त्वाचं असतं. कारण नामांकन मिळणं देखील मोठी गोष्ट असते. लवकरच ‘झी मराठी अवॉर्ड 2024’ पार पडणार आहे. त्या आधी कोणत्या कलाकारांना नामांकन मिळालं त्याची यादी समोर आली आहे. त्यासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच झी मराठीनं ‘झी मराठी अवॉर्ड 2024’ नामांकन पार्टीचं आयोजन केलं होतं. वेषभूषेसाठी यावेळची थीम होती Glittering Orange होती. सर्व कलाकारांनी पार्टीच्या थीमचे अनुसरण केले आणि त्यांच्या उत्कृष्ट केशरी पोशाखात तयार होऊन ते हजर झाले होते. झी मराठीसाठी आणि कलाकारांसाठी हे डबल सेलिब्रशन होतं कारण एक तर झी मराठी अवॉर्ड्स 2024 च्या नामांकन पार्टी आणि दुसरं म्हणजे झी मराठीचं पंचविसावं महोत्सवी वर्ष. या निमित्तानं झी मराठीचं संपूर्ण कुटुंब एकत्र एका छताखाली आलं, आजपर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि एकमेकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी.


लक्षवेधी गोष्ट म्हणजे जे कलाकार झी कुटुंबात 1999 पासून सामील आहेत त्यांनी ही आपल्या लाडक्या वाहिनीच्या या पंचविसाव्या वर्षाच्या महोत्सवात हजेरी लावली होती. जसजशी एका एका मालिकेची नामांकनं जाहीर होत होती, तसतशी कलाकारांची उत्कंठा अधिकच वाढत होती. प्रत्येकजण फक्त आपल्या मालिकेच्या कलाकारांनाच नाही तर दुसऱ्या कलाकारांच्या मालिकेलाही  तेवढच समर्थन करताना दिसले. नामांकन जाहीर झाल्यावर स्टेजवर आणखीन एक कार्यक्रम रंगला. सध्या चर्चेत असलेला क्रेटेक्स, मुंबईचा एक प्रतिष्ठित डीजे आणि संगीत निर्माता तो ही 'झी मराठी अवॉर्ड्स 2024 ’ नामांकन पार्टी मध्ये सहभागी झाला आणि आपलं सुप्रसिद्ध गाणं 'तांबडी चामडी' वर सगळ्या कलाकारांना थिरकवले. कलाकारांनी केशरी रंगाच्या पेहेरावातून रेड कार्पेटवर चारचाँद लावले. उत्तोरोत्तर रंगत गेलेल्या या धमाल नामांकन सोहळ्यानंतर आता उत्कंठा लागली आहे ती 'झी मराठी अवॉर्ड्स 2024' च्या भव्य सोहळ्याची. प्रेक्षकांना हे सर्व लवकरच बघायला मिळणार आहे, पण कधी हे जाणून घेण्यासाठी बघत राहा आपली लाडकी वाहिणी झी मराठी.