झी मराठी वाहिनीचा यशस्वी प्रवास, मराठी मातीतल्या गोष्टी जग जिंकतात!
झी मराठी वाहिनीचा यशस्वी प्रवास प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे.... प्रेक्षकांसाठी खास भेट
मुंबई : गेल्या 22 वर्षांपासून म्हणजे 1999 सालापासून झी मराठी वाहिनी मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनाची अभिरुची जपली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भाषांमधील मालिकांचे मराठी सिक्वल्स बनत आहेत. पण झी मराठीने कटाक्षाने टाळलं आहे. झी मराठी वाहिनीला फक्त मातीतल्या गोष्टींवर विश्वास आहे आणि पुढे देखील हा विश्वास असाचं राहिल.
झी मराठी कायम सांस्कृतिक परंपरा जपली आणि मालिकांच्या सादरीकरणातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली. महत्त्वाचं म्हणजे, मराठी मातीतल्या गोष्टींनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांचे हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या प्रादेशिक भाषांमध्ये गेल्या 5-6 वर्षांपासून सातत्याने रिमेक केले जात आहेत.
आता झी मराठीवर गाजलेली मालिका म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका आता प्रेक्षकांना हिंदीतही पाहाता येणार आहे.
मालिकाहिंदीमध्ये डब करून हिंदी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.झी अनमोल या वाहिनीवर ही मालिका 'मेरे साजन कि सहेली' या नावानं पाहायला मिळणार आहे. फक्त 'माझ्या नवऱ्याची बायको'चं नाही तर आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका देखील हिंदीमध्ये डब करून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिका बिग मॅजिक या हिंदी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी यंदाच्या वर्षातील खास भेट असणार आहे.
दोन मराठी मालिका आता प्रेक्षकांना आता हिंदी भाषेत अनुभवता येणार आहेत. त्यामुळे झी मराठी वाहिनीचा यशस्वी प्रवास प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे. या नव्या वर्षात वेगळ्या आणि मराठी मातीशी इमान राखणाऱ्या अस्सल मराठी मालिका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.