Zee SaReGaMaPa मध्ये आला सल्लूभाई! ओ ओ जानेजाना गाणं सुरु झाल्यावर सलमान ने काय केलं पाहा
सलमान खानचं हे गाणं लागल्यावर त्याने काय केलं पाहा..
मुंबई : चाहत्यांचा लाडका अभिनेता म्हणजे सलमान खान. भाईजानचा कोणताही सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमागृहात चाहत्यांची एकच गर्दी जमते. आता तर तब्बल दोन वर्षांनंतर 'अंतिम' सिनेमाच्या माध्यमातून सलमान चाहत्यांच्या भेटीला आला. नवीन सिनेमा आहे तर त्याचं जोरदार प्रमोशन तर होणारचं. 'अंतिम' सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमानने देखील मेहनत घेतली. सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान 'झी सा रे ग मा पा' शोमध्ये पोहोचला, तेव्हा त्याने प्रचंड मस्ती केली.
प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शोमध्ये स्पर्धकांनी सलमानच्या जुन्या सिनेमांमधील गाणी गायली. स्पर्धकाने ओ ओ जानेजाना गाणं गायलं आणि सलमान पूर्ण जोशमध्ये आला. गाणं सुरू होताचं तो स्टेजवर आला आला आणि गाण्यावर डान्स करू लागला. पाहा व्हिडीओ...
यावेळी आदीत्य नारायणने सलमानला अनेक प्रश्न विचारला. त्याने सलमानला विचारलं, 'तू अंतिम कोणाच्या लग्नात नाराज झाला होतास?' या प्रश्नाचं उत्तर देताना सलमान म्हणाला, 'आतापर्यंत मी कोणाच्याही लग्नानंतर नाराज झालो नाही. मी प्रत्येकासाठी आनंदी असतो..'
सध्या सलमानचा अंतिम सिनेमा रूपेरी पडद्यावर जोरदार कामगिरी करत आहे. सिनेमात सलमान व्यतिरिक्त अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री महिमा मकवाना मुख्य भूमिकेत आहेत.