मुंबई : चित्रपटांचा पूर्वीपासून मानवी मनाशी तेवढाच नातेसंबंध आहे, जेवढा आता आहे. कल्पनाविलास, अतिशयोक्ती, स्वप्नरंजन या पायांवर उभी असणारी ही चंदेरी दुनिया प्रत्येकाची पहिली आवड आहे. चित्रपट आणि प्रेक्षकांना मनोरंजनाच्या धाग्याने जोडून ठेवणारी महाराष्ट्राची लाडकी वाहिनी झी टॉकीज गेली अनेक वर्ष प्रेक्षकांची हीच आवड जपत सदाबहार चित्रपट सादर करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनाचासाठी झी टॉकीज 'टॉकीज मनोरंजन लीग' त्यांच्या भेटीस घेऊन आली. भक्तिपर, कॉमेडी, ऍक्शन यानंतर आता येत्या रविवारी टॉकीज मनोरंजन लीग मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे भरगोस ड्रामा.


२५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून प्रेक्षकांसाठी झी टॉकीज वाहिनी एका पेक्षा एक ड्रामा आणि मनोरंजनने भरपूर चित्रपट प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. श्रीराम लागू यांचा सदाबहार चित्रपट 'पिंजरा' सकाळी ९ वाजता तर दुपारी १२ वाजता नाना पाटेकर यांचा अजरामर चित्रपट 'नटसम्राट' प्रेक्षकांच्या भेटीस येईल.


दुपारी ३ वाजता अभिनेत्री अलका कुबल यांचा 'माहेरची साडी' हा सुपरहिट चित्रपट आणि संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांच्या हृदयात घर केलेला सैराट हा चित्रपट प्रसारित होईल. तर रात्री ९ वाजता अशोक सराफ आणि रंजना या धमाल जोडीचा सुपरहिट चित्रपट 'बिन कामाचा नवरा' टॉकीज मनोरंजनाची सांगता करेल. तेव्हा भरघोस ड्रामा अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका 'टॉकीज मनोरंजन लीग' २५ एप्रिल सकाळी ९ वाजल्यापासून फक्त झी टॉकीजवर