मुंबई : प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या 'झी युवा' वाहिनीवर काही कालावधीपूर्वी, 'युवा डान्सिंग क्वीन' ही नृत्य स्पर्धा सुरू झाली. अल्पावधीतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धकांचे उकृष्ट डान्स परफॉर्मन्स व सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांचे उत्तम परीक्षण यामुळे दिवसेंदिवस या स्पर्धेत अधिक रंग भरले गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला सोळा ललनांचा सहभाग असलेली ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली असताना, अंतिम फेरीसाठीची चुरस वाढलेली दिसते आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सगळ्या स्पर्धकांची अतोनात धडपड सुरू आहे. अशावेळी, सर्व स्पर्धकांना, परीक्षकांकडून एक खास सरप्राईज मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर अनेक सेलिब्रिटी मंडळींनी आजवर हजेरी लावलेली आहे. पण, या सर्व  सेलिब्रिटी मंडळींहून अधिक स्पेशल असणारे काही पाहुणे 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर यावेळी उपस्थित होते. स्पर्धेच्या 'गुढीपाडवा' स्पेशल भागात, सर्व स्पर्धकांच्या मातोश्रींना खास आमंत्रण देण्यात आलेले होते. परीक्षक मयूर आणि सोनाली यांनी दिलेले हे सरप्राईज, सर्वच स्पर्धकांसाठी खूपच खास ठरले. आपल्या आईला मंचावर बघून कुणालाही आनंदाश्रू रोखता आले नाहीत.



मोठ्या कालावधीनंतर आईला भेटणाऱ्या प्रत्येकच स्पर्धकासाठी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती; ती म्हणजे आईसमोर आपले सर्वोत्तम सादरीकरण दाखवण्याची मिळालेली संधी! 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर, गुढीपाडवा, म्हणजेच हिंदूनववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. नवीन वर्षाचे स्वागत करत असताना, आईच्या आशीर्वादाची थाप स्पर्धकांना लाभली. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी मेहनत घेण्याची नवी ऊर्जा यामुळे सर्वांना मिळाली.



कोरोनामुळे उद्भवलेल्या महामारीला तोंड देण्यासाठी, संपूर्ण देश २१ दिवसांकरिता लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. पंतप्रधानांच्या या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. प्रत्येकाने घरी राहणे आपल्या सगळ्यांच्याच हितासाठी अत्यावश्यक आहे. याकाळात, 'युवा डान्सिंग क्वीन' स्पर्धेतील, नृत्यांगनांचे जबरदस्त परफॉर्मन्स नक्की पाहा. आणि मंचावर घडलेली ही भावनिक भेट अनुभवण्याची संधी गमावू नका. त्यासाठी, अवश्य पाहत रहा, तुमची, आमची, सगळ्यांची लाडकी वाहिनी, 'झी युवा'; बुधवार ते शुक्रवार, रात्री ९.३० वाजता!!!