वाराणसी : घरातील मंगल कार्यापासून ते संसदेतील सोहळ्यापर्यंत आणि भारतातील एखाद्या खेड्यातून ते थेट विदेशातील उच्चभ्रू वर्तुळापर्यंत, सनईचे सप्तसूर पोहचवणाऱ्या बिस्मिल्ला खान यांची वेगळी ओळख सांगण्यची गरज नाही. पण, आज हे सांगवे लागते आहे. त्याला कारणही तसेच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या सनईच्या सुरांनी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बिस्मिल्ला खान यांना अवघ्या जगाने डोक्यावर घेतले. ज्या व्यक्तीला जगाने डोक्यावर घेतले त्या व्यक्तीच्या पूढील सात पिढ्या बसून खातील, असा आपल्याकडील एक मोठा समज. अनेकांच्या बाबतीत तो खराही ठरतो. बिस्मिल्ला खान यांचा परिवार मात्र याला अपवाद ठरला. आज (२१ ऑगस्ट) त्यांची ११ जयंती आहे. आज त्यांना आठवताना जगाने त्यांना लवकरच विसरले आहे असे वाटते. आपल्या सनईच्या सूरांनी अनेकांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या या अवलीयाच्या कुटूंबीयांवर सध्या हालाकीची स्थिती आली आहे. त्यांना आधाराची गरज आहे.



खान यांचे नातू नाजिम सांगतात की, 'दादा (आजोबा) गेल्यावर सगळे चित्रच बदलले आहे. कुटूंब आर्थिक विवंचनेत आहे. घरखर्च कसातरी भागतो'. वाराणसी येथील दालमंडी येथे उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे वडिलोपार्जीत घर आहे. याच घरात त्यांनी अनेक मैफीली रंगवल्या आणि इथेच त्यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा पद्म विभूषण पुरस्कारही देण्यात आला. नाजिम सांगतात की, 'आता आम्हाला कोणीच ओळखत नाही. अब्बांना पद्म विभूषण मिळाला होता. पण, त्याला आज काहीच किंमत नाही. त्यांच्या खोलीत आजही त्यांनी वापरलेले जोडे, छत्री, टेलिफोन, खूर्ची, लॅम्प, ताट-वाटी तशीच आहे. रेडिओची मान्यता मिळूनही त्यांना रेडिओकडून ५ वर्षात एकही प्रोग्राम मिळाला नाही'.



पूढे बोलताना नासिर सांगतात की, 'घरची स्थिती जर पाहाला तर, आम्हाला प्रश्न पडतो की, कुटूंबाचे पोट कसे चालवायचे. दादांचा वारसा चालवायचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी सनई वादनाचा वर्षातून एखादा प्रोग्राम होतो पण, त्यातून मिळालेले पैसै एकदोन महिन्यातच संपतात'.



एक आठवण सांगताना नाजिम समोरच्याला हळवे करून सोडतात. नाजिम म्हणतात, 'आम्ही लहान असताना एक अमेरिकन व्यापारी काशीला आला होता. तो दादांना म्हणत होता, 'वाट्टेल तेवढा पैसा घ्या पण, अमेरिकेला चला' त्यावर दादांनी त्याला उत्तर दिले, 'तिथे पैसा मिळेल पण, मला गंगा मिळेल?, जमत असेल तर, इथून गंगेलाही सोबत घ्या!, ती येत असेल तरच मी येईन'' या आठवणी सांगताना बिस्मिल्ला खान यांचे नातू जुन्या आठवणींत हरवतात.