लिंबाच्या सालीचे `१०` आर्श्चयकारक फायदे!
लिंबू बहुगुणी आहे, असे म्हणाल्यास वावगे ठरणार नाही.
नवी दिल्ली : लिंबू बहुगुणी आहे, असे म्हणाल्यास वावगे ठरणार नाही. कारण त्याचे अनेक विविध फायदे आहेत. त्यापैकी काही फायदे आपण आज जाणून घेणार आहोत. पण तुम्हाला माहित आहे का? लिंबाप्रमाणेच लिंबाची सालही अत्यंत फायदेशीर असते. तर मग आता लिंबाची साल फेकून देण्याची चूक करू नका. तर ती अशी उपयोगात आणा.
१. लिंबाच्या सालीत व्हिटॉमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर यांसारखे अनेक पोषकघटक असतात. मेडिकल एक्सपर्ट्सनुसार लिंबाची सालही लिंबू पाण्यापेक्षा अधिक उपयुक्त असते.
२. लिंबाच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटॉमिन सी भरपूर असल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
३. लिंबाच्या सालीच्या वापरामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यात असलेल्या अॅँटी ऑक्सीडेंटमुळे स्किन कॅन्सरला प्रतिबंध होण्यास मदत होते.
४. व्हिटॉमिन सी आपल्या त्वचेसाठी अत्यंत गरजेचे आहे. लिंबाच्या सालीत ते भरपूर प्रमाणात असते. याच्या वापरामुळे त्वचेचा कॅन्सर, हृदयाचे आजार दूर होण्यास मदत होते.
५. लिंबाच्या सालीत असलेल्या मिनरल्समुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे आपले पचन अधिक चांगल्या प्रकारे होते आणि परिणामी अनेक आजारांपासून सुटका मिळते.
६. तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीवर लिंबाची साल फायदेशीर ठरते.
७. लिंबाच्या सालीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. जर तुमचे रक्तदाब नियंत्रित असेल तर हृदयासंबंधिच्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते.
८. बदलत्या काळानुसार आपली जीवनशैलीही अत्यंत बदलली आहे. अधिकतर लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी लिंबाची साल उपयुक्त ठरते.
९. महत्त्वाचे म्हणजे ताण दूर करण्यास लिंबाच्या सालीची मदत होते. यात काही प्रमाणात फ्लेवानॉयड असते. त्यामुळे आपला ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस दूर होतो.
१०. लिंबाच्या सेवनाने लिव्हर साफ होण्यास मदत होते. रक्ताभिसण चांगले होते.