पावसाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी 10 टिप्स
नक्की वाचा या टिप्स
मुंबई : पावसाळा आता मध्यावर आला आहे. सतत कोसळणारा पाऊस काहीसा कमी झाला आहे. पावसाळा-उन्हाळा-हिवाळा अशा मिश्र वातावरणाचा प्रभाव आपल्याला अनुभवता येत आहे. त्यामुळे आज आपण अशा ऋतूत नक्की कशी काळजी घ्यायची हे पाहू. बदलत्या वातावरणाचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे काही प्रमाणावर काळजी घेणे आवश्यक आहे.
१] हात - पाय स्वच्छ धुणे - आपल्याला लहान असल्यापासून शिकवलेले आहे बाहेरुन आल्यावर हात पाय धुणे. आपण प्रवासात, बस, ट्रेन मध्ये चढता- उतरताना, ऑफिसमध्ये, मार्केटात, शाळेत, कॉलेजात, आपले हात आपल्या नकळत ब्याक्टेरिया, वायरसेस जमा करत असतात. त्यामुळे बाहेरून घरी पोचल्यावर, प्रत्येक जेवणाआधी, काहीही खाण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. आजकाल आपल्याला hand sanitizer सहज उपलब्ध असतात. ते जवळ बाळगा आणि त्याचा योग्य वापर करा.
२] पावसाळ्यात रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्न खाणे टाळावे- आरोग्याची काळजी खूप महत्वाची आहे. पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते. बॅक्टेरिया, वायरसेसचे वाढलेले प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. अनेकदा हे पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले पाणी नीट गाळलेले उकळलेले नसते त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या खाण्यावर माश्या बसून ते अन्न दुषित करतात. त्यामुळे बाहेरचे अन्न खाने टाळावे.
३] डासांपासून सुरक्षित रहा - पावसाळ्याच्या दिवसात डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डासांपासून सुरक्षेची काळजी घ्या. डासांना दूर ठेवणारे क्रीम [mosquito repellent ] चा वापर करा तसेच घरात किंवा घराच्या आसपास पाणी फार काळ साठून राहणार नाही ह्याची काळजी घ्या. साठलेल्या पाण्यात डासांची पैदास जास्त होते. डासांमुळे डेंगू मलेरिया सारखे आजार पसरतात.
४] पाणी उकळून प्या आणि त्याचे प्रमाण वाढवा - पावसाळ्यात कमी तहान लागते त्यामुळे आपोआप कमी पाणी प्यायले जाते. पण स्वास्थ्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती साठी, शरीरातील toxins चा नीट निचरा होण्यासाठी शरीराला साधारण ३ लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे आठवण ठेऊन, गरज पडल्यास दर एक तासाचा अलार्म लावून दिवसभरात ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.
५] योग्य आहार घ्यावा- पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते तेव्हा सकस, शुद्ध, पोषक घरचे अन्नच खावे. भाज्या, फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत होते. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपल्या रोजच्या आहारात भरपूर समावेश करावा. मसाल्याचे पदार्थ सुद्धा पचनाला मदत करतात. पण पावसाळ्यात खूप तिखट पदार्थ खाणे टाळावे.
६] रोग प्रतिकार शक्ती वाढवा - लसूण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे सर्दी खोकला, ताप अशा पावसाळी आजारांपासून सहज संरक्षण मिळते. मसाल्याचे इतर पदार्थ देखील रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त ठरतात. तसेच मसाल्याचे पदार्थ जसे की मिरपूड, आले, हिंग, हळद, कोथिंबीर, जीर लिंबू पचनसंस्था नीट काम करण्यासाठी देखील मदत करतात.
७] त्वचेची काळजी घ्या - पावसाळ्यात त्वचेचे इन्फेक्शन टाळण्यासाठी जेवणात कडू भाज्यांचा समावेश करा. जसे की मेथी, कार्ले, कडुलिंब इ. ह्या भाज्यांमधील रसायने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. चेहऱ्याचा तवटवीतपणा टिकून राहण्यासाठी मदत होते. ह्या पदार्थातील रसायनांचे अनेक फायदे शरीराला होतात.
८] शरीरातील मिठाचे प्रमाण - पावसाळ्यात मिठाचे प्रमाण शक्य तेवढे कमी ठेवावे. तसेच चिंच, लोणच, चटणी अशा आंबट गोष्टी टाळाव्यात. ह्या पदार्थांमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढून [ water retention] शरीराला सूज येण्याची शकता असते.
९] तळलेले, मांसाहारी पदार्थ टाळा – पचायला जडअसणारे पडणारे पदार्थ टाळा. कारण पावसाळ्यात पचनसंस्था थोडी अशक्त झालेली असते त्यात जरखूप क्लिष्ट आणि पचायला जाड पदार्थ खाल्ले तर आजारी पडण्याची शक्यता असते.
१०] दिवसभरात मधल्या वेळेत जेव्हा भूक लागेल तेव्हा गरम सूप, हर्बल टी, ग्रीन टी अशी पेय घेणे जास्त चांगले. पावसाळ्यात बाजारातील शीतपेय पेय घेणे टाळावे. शीतपेय शरीरातील खनिज साठ कमी करतात त्यामुळे शरीरातील enzyme activity कमी होते ज्यामुळे पचनसंस्थे वरचा ताण वाढतो.ह्या बारीकसारीक सवयींची काळजी घ्या आणि निरोगी राहून ह्या वर्ष ऋतूचा मनसोक्त आनंद लुटा.