जिनिव्हा : डोळ्यांसंबंधी समस्यांवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये, लहान मुलांद्वारे अधिक वेळ घरात व्यतित केल्याने मायोपिया यांसारखी डोळ्यांसंबंधी समस्या वाढत असल्याचा धोका व्यक्त केला आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात, या वाढत्या समस्यांचा स्मार्टफोन किंवा इतर कोणत्याही स्क्रिनशी संबंध जोडण्यात आलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधत्व व बहिरेपणापासून बचाव करण्यासाठी 'डब्ल्यूएच'ओ समन्वयक स्पॅनिश डॉक्टर अलार्कोस सीजा यांनी सादर केलेल्या कागदपत्रात असे दिसून आले आहे की, जगभरात २.२ अब्ज लोक डोळ्यांच्या काही ना काही आजाराने त्रस्त असल्याचे बोलले जात आहे.


डोळ्यांच्या समस्येवर अनेक देशांमध्ये वृद्धांची वाढती संख्या आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये नेत्र चिकित्सा योग्य प्रकारे उपलब्ध नसणे या गोष्टी काही प्रमाणात जबाबदार असल्याची शक्यता आहे. परंतु डोळ्यांसंबंधी समस्या वाढण्यामागे अनेकदा शरीरिक निष्क्रियता आणि जीवनशैलीत होणारे बदल हे प्रमुख कारण असल्याची माहिती आहे.


सध्या डोळ्यांच्या जवळपास निम्म्या समस्या रोखल्या जाण्याची शक्यता आहे. WHOने देशांना, नेत्रसंबंधी समस्यांचा आरोग्य योजनांमध्ये समावेश करण्याचे आवाहन केले आहे.