मुंबई : ऑटिझम हा लहान मुलांमध्ये दिसणारा आजार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसजशी मुलं वाढायला लागतात तशी या आजाराची लक्षण दिसतात. पण अनेकदा मुलं गप्प राहतात म्हणजे ती लाजाळू आहेत असा समज झाल्याने 'ऑटिझम' ही समस्या वाढत असेल हा अंदाज अनेक पालकांना नसतो. 


जन्म  झाल्यापासून वयाच्या तीन वर्षांपर्यंत ऑटिझमही नकळत वाढत असतो. या आजाराचे निदान करण्यासाठी कोणतीच ठोस पद्धती नाही. 


काही प्रश्नांवरून मिळावा उत्तर  


एका संशोधनानुसार, केवळ दोन मिनिटांच्या प्रश्न उत्तरांमधून लहान मुलांमध्ये ऑटिझम वाढत असल्याचे निदान होऊ शकते. सायकोलॉजी डेव्हलपमेंट प्रश्नावली  (पीडीक्यू -1) मध्ये 10 प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांवरून मुलांच्या संभाषण कौशल्याची माहिती मिळते. 


 



कशी असते परीक्षा  


मुलं कशाप्रकारे बोलतात ? बोलण्यासाठी ते किती उत्सुक आहेत? अंकगणित, त्यांचे नाव उच्चारल्यानंतर मुलांची रिअ‍ॅक्शन काय आहे ? वाक्य कशी बोलतात ? यावरून मुलांमधील वाढत चाललेल्या ऑटिझमच्या लक्षणांचे संकेत मिळतात. 


कोणी बनवली ही प्रश्नावली ? 


रटगर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटिझमच्या 88 % मुलांमधील लक्षणांची अचूक माहिती मिळाली आहे. 2012 च्या एनसीएचएस डाटा ब्रीफमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार अर्धाहून अधिक ऑटिझमग्रस्त मुलांमध्ये वयाच्या 5 वर्षांपर्यंत या आजाराचे संकेत मिळू शकतात. तर 20% लोकांमध्ये दोन वर्षांच्या आधी ऑटिझमचा अंदाज मिळू शकतो. 


डॉ. जहोरोदनी आणि त्यांच्या सहकर्मचार्‍यांनी मिळून 1-3 वर्षातील सुमारे 2000 मुलांवरहा प्रयोग केला. या मुलांचा पीडीयू टेस्टचा निकाल ऑटिझमचा संकेत देणारा ठरला. संशोधकांनी सुमारे 88 %  मुलांचा निकाल यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे.