मुंबई : तुम्ही तुमच्या मुलांना आवडीनं मोबाईल फोन घेऊन दिला असेल तर ही बातमी नक्की पाहा. मोबाईलच्या व्यसनामुळं एक 20 वर्षांचा तरुण वेडापिसा झालाय. राजस्थानातला 20 वर्षांचा तरुण. या तरुणाला मोबाईलचं एवढं वेड लागलंय की, गेल्या पाच दिवसांपासून त्याची झोप उडालीय. कामधंदा सोडून रात्र रात्रभर तो मोबाईलवर चॅटिंग आणि गेम खेळत असतो. मोबाईलच्या व्यसनामुळं त्यानं खाणपिणंही सोडून दिलंय. एवढंच काय, तर तो आपल्या घरच्यांना देखील ओळखेनासा झालाय. तज्ज्ञांच्या मते मोबाईल स्मार्टफोनचा वापर लहान मुलं आणि तरुणांसाठी धोकादायक ठरतोय. (20 year old young man has mentally in Rajasthan due to mobile Overuse) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे तोटे


मोबाईलच्या अतिवापरामुळं मुलांची स्मरणशक्ती कमी होते. मोबाईलच्या रेडिएशनमुळं मुलांच्या स्मृतीवर परिणाम होतो. आकडेमोड जमत नाही, साधं गणितही करता येत नाही. सतत मोबाईल स्क्रीन पाहून डोळ्यांवर गंभीर परिणाम होतो. 



कोरोना काळात सगळं शिक्षण ऑनलाईन होत असल्यानं मोबाईल स्मार्टफोन ही आता गरज बनलीय. त्यामुळं मुलांना मोबाईल द्यावा की न द्यावा, अशी पालकांची कोंडी झालीय. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी त्यांची बिकट अवस्था आहे.