नवी दिल्ली : भारतात सुमारे २९ लाख मूळ गोवरच्या लसीपासून वंचित राहतात. गोवरमुळे जगभरात सुमारे ९०००० मुलांचे बळी जात आहेत. अग्रणी स्वास्थ्य संस्थेने सादर केलेल्या एका नव्या रिपोर्टमधून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे या रोगाचे संपूर्ण उच्चाटन होण्यापासून जग अजून दूर आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कारण २ कोटींपैकी ८ लाख मुलांना गोवरची लस मिळतच नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आडकेवारीत अर्ध्याहून अधिक मुलं ही या सहा देशातील आहेत. नायजिरिया (३३ लाख), भारत (२९ लाख), इंडोनेशिया (१२ लाख), इथियोपिया (९ लाख) आणि कांगो गणराज्य (७ लाख). २०१६ मध्ये गोवरने सुमारे ९० हजार मुलांचा मृत्यू झाला. ही संख्या २००० सालापेक्षा ८४ टक्क्यांनी कमी आहे. कारण त्यावर्षी गोवरमुळे सुमारे ५,५०,००० मुलांनाच मृत्यू झाला होता. 


ही माहिती विश्व स्वास्थ्य संघटना, यूनिसेफ, सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन  यांनी सादर केलेल्या रिपोर्टमधून समोर आली आहे.