मुंबई : पावसाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये अल्हाददायक गारवा जाणवतो. पावसात भिजता भिजता भाजलेल्या मक्याचा आस्वाद घेणं अनेकांना सुखकारक वाटते. 
केवळ पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नव्हे तर अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठीही मका खाणं फायादेशीर आहे. पण मक्यावर काही पदार्थ खाणं आरोग्याला त्रासदायक आहे. त्यामुळे त्याची काळजी नक्की घ्यायलाच  हवी.  


मका खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ टाळाल ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. मका खाल्ल्यानंतर त्यावर पिकलेला पपई खाणं टाळा. यामुए त्वचेला नुकसान होते. चेहर्‍यावर पांढरे डाग वाढतात. 


2. गरम मका खाल्ल्यानंतर त्यावर लगेच हळदीचं दूध पिणं टाळा. यामुळे चेहर्‍यावर पांढरे डाग दिसतात. 


3. भाजलेला मका खाल्ल्यानंतर त्यावर लगेजच पाणी पिणेदेखील टाळा. यामुळे पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो. मक्यात कार्ब्स आणि स्टार्च घटक अधिक प्रमाणात आढळतात. यावर पाणी प्यायल्याने पोटात त्रास होऊ शकतो. परिणामी अ‍ॅसिडीटी, पोट्दुखी, पोटात मुरडा मारणं असा त्रास वाढू शकतो.