Habit can ruin your life : चांगल्या सवयींचा माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा वाटा असतो. त्या सवयींमुळे त्याची ओळख होत असते. चांगल्या सवयींमुळे (Good habits) माणूस यशस्वी होतो तर वाईट सवयींमुळे माणसाला यशस्वी होण्यात बराच काळ लागतो. सवयींमुळे माणसाचा विकास होत असतो. काही सवयी योग्य वेळी बदल्यास त्याचा आपल्याला फायदा देखील होतो. पण एखाद्या गोष्टीची सवय झाल्यावर त्या सवयी बदलणे थोडे कठीण जाते. आज आपण अशा तीन सवयींविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी थांबवणार नाही. (3 Habits can ruin your life nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. स्वत:सोबत खोटे बोलणे टाळा (Avoid lying to yourself)
अपेक्षांचे ओझे आणि ते पूर्ण करण्यासाठीची शर्यत या साऱ्यामध्ये नकळत आपण स्वत:चीच फसवणूक करू लागतो. ही फसवणूक अनेकदा भावनिक असते. जेव्हा आपल्याला फसवणूक (Fraud) झाल्याची जाणीव होते तेव्हा मात्र फार उशीर झालेला असतो. मुळात या गोष्टीकडे लक्ष देत आपण स्वत:शी किती प्रामाणिक आहोत यावर लक्ष देणं कधीही महत्त्वाचे. 


आणखी वाचा : Personality Test: तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य कपाळावरून जाणून घ्या , सिक्रेट माहिती आता आली समोर


2. सामाजिक अपेक्षा (social expectations)


समाजाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे महत्त्वाचे नसून आपल्या स्वत:कडून काय अपेक्षा आहेत याचा विचार केल्यास तुम्ही फायद्यात राहाल. अनेकदा आपण इतरांचा विचार करता करता स्वत:सोबत चुकीचे वागतो. सामाजिक अपेक्षा पूर्ण करताना स्वत:चा अपेक्षा जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही.


3. स्वत:ला महत्त्व द्या (Value yourself)
आपण नेहमीच समोरच्यांना इतके महत्त्व देतो की नंतर ते आपल्यासाठी निर्णय घेऊ लागतात. स्वत:ला महत्त्व द्या. इतरांच्या विचारांना किंवा त्यांच्या मतांना बळी पडू नका.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


आणखी वाचा : Black Water : सेलिब्रिटी पीत असलेल्या काळ्या पाण्यामध्ये नक्की असतं तरी काय जाणून घ्या..