भारत लठ्ठपणाने झुंजत आहे. भारतातील अनेक नागरिकांना वजन अधिक असल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असं सगळं असताना वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावे? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 30-30-30 चा फॉर्म्युला ट्रेंड करत आहे. यामध्ये कोणतेही स्ट्रिक्ट डाएट नाही पण वजन कमी करण्यासाठी योग्य फॉर्म्युला वापरला जातो. ज्यामुळे तुमचं वजन झपाट्याने आणि योग्य पद्धतीने कमी होते. 


30 टक्के कॅलरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन कमी करत असताना कॅलरीज कंट्रोलमध्ये ठेवणे अत्यंत गरजेचे असते. 30-30-30 हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. वजन कमी करताना याला फोकस करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमच्या रोजच्या कॅलरीजचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी करायचे असेल तर खूप मदत होऊ शकते. रोजच्या जेवणातून तुम्हाला हळूहळू 30 टक्के कॅलरी कमी करणे गरजेचे असते. 


30 मिनिटे जेवा 


वजन कमी करत असताना काय जेवतो यासोबतच कसे जेवतो हे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. अन्न निट 30 मिनिटे चावून खाणे हे देखील वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. आपल्यासाठी अन्न जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते नीट चघळणेही महत्त्वाचे आहे. अन्न नेहमी चावून चावून खावे असे कायम सांगितले जाते. पण याचा सर्वाधिक फायदा होतो. संपूर्ण आहार नीट चावून खाणे याला माइंडफुल इटिंग म्हणतात. 


30 मिनिटे व्यायाम करा 


व्यायाम हा आपल्या आरोग्याचा आणि फिटनेसचा एक आवश्यक भाग आहे. वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, तुम्ही ३० मिनिटांचा व्यायाम तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनवू शकता. असे केल्याने केवळ कॅलरीज बर्न होत नाहीत तर एकूणच आरोग्य सुधारते. तुम्ही चालणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करूनही तंदुरुस्त राहू शकता.


वजन कमी करण्याच्या टिप्स 


वजन कमी करण्याची प्रक्रिया खूपच मंद आहे. प्रत्येक व्यक्तीवर त्याचे वेगवेगळे परिणाम होतात. वजन कमी करण्याची कोणतीही योजना सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.


  • वजन कमी करण्यासाठी कॅलरी नियंत्रित आहार घ्या.

  • कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग एकत्र करून नियमित वर्कआउट करा.

  • साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा.

  • संपूर्ण अन्न, फळे, भाज्या आणि पातळ प्रथिने खाण्यावर लक्ष केंद्रित करा. हायड्रेटेड रहा आणि पुरेशी झोप घ्या.

  • तुम्ही अधूनमधून उपवास सुरू करू शकता.