महिलांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी, कारण काय?
Women Health in 40 Age : महिलांना चाळीशीनंतर रेग्युलर चेकअप करण्याचा सल्ला दिला जातो. कारण घाणेरडा कोलेस्ट्रॉल वाढल्यास महिलांमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोका टाळता येतो.
High cholesterol symptoms : शरीरात घाणेरड्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास त्याची लक्षणे दिसून येत नाही. पण शरीरात होणारे बदल किंवा काही समस्या ही त्याची लक्षणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. महिलांना वयाच्या 40 नंतर हाय कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवते. धमण्यांमध्ये म्हणजेच आर्टरीजमध्ये कोलेस्ट्रॉल चिकट स्वरुपात जमा होतो.
महिलांनी चाळीशीनंतर घ्यावी विशेष काळजी
महिलांनी विशेष करुन वयाच्या चाळीशीनंतर विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण या काळात महिला अनेक ताण-तणावासोबतच शारीरिक बदलातून जात असतात. जसे की, मेनोपॉझ, स्नायूंमधील बदल, मानसिक स्थिती. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम शरीरावर होत असतो. अशावेळी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास पुढील लक्षणे दिसून येतात.
अशावेळी महिलांमध्ये पुरुषांपेक्षा वेगळी लक्षणे दिसून येतात. जी पुढीलप्रमाणे आहेत.
डोळ्यांमध्ये थकवा
अनेक वेळा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की त्याचा परिणाम डोळ्यांवरही दिसून येतो. कोलेस्ट्रॉलमुळे, दृष्टी अंधुक होऊ शकते किंवा दृष्टी पूर्णपणे गमावू शकते. त्यामुळे डोळे चुरचुरणे, लाल होणे आणि थकवा येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पायात पेटगे येणे
पाय दुखणे हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे. पाय दुखण्याचे मुख्य कारण म्हणजे कोलेस्ट्रॉलमुळे पायांमध्ये असलेल्या रक्तवाहिन्या बंद होतात किंवा आकसतात. अशा परिस्थितीत जेव्हा महिला चालतात किंवा शारीरिक हालचाली करतात तेव्हा त्यांना पाय दुखू लागतात. साधारण चालत असतानाही पाय दुखण्याची समस्या सुरू होते.
अतिशय घाम येणे
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे काहींना जास्त घाम येऊ लागतो. संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याने असे घडते. ऑक्सिजनच्या कमतरतेचे कारण म्हणजे रक्तप्रवाहात अडथळा. तुम्हाला हे माहित असेलच की खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेक रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. जर तुम्हाला रात्री झोपताना खूप घाम येत असेल, तर एकदा तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणे चांगले.
छातीत दुखणे
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांवरही परिणाम होतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास रक्तप्रवाहावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, कधीकधी एक महिला छातीत दुखण्याची तक्रार करू शकते. अगदी कोरोनरी आर्टरीशी संबंधित आजार देखील होऊ शकतात. म्हणून, प्रत्येक स्त्रीने कोरोनरी धमनी रोगाच्या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)