मुंबई : कोरोना व्हायरसचा फैलाव जगात मोठ्या प्रमाणात होत आहे. जवळपास ४० वर्षींपूर्वी एका लेखकाना कोरोना विषयी भविष्यवाणी केली होती. डीन कोन्टोज असं त्या लेखकाचं नाव आहे. लेखकाने पहिल्यांदा आपल्या पुस्तकात 'कोरोना' शब्दाचा उल्लेख केला होता.या जीवघेण्यया व्हायरसविषयी कोणाला माहित होत का? या व्हायरसमुळे हजारो चीनी बांधव मृत्यूमुखी पडतील याची चाहुल यापूर्वी कोणाला लागली होती का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. परंतु वैज्ञानिक आणि डॉक्टरांचा या गोष्टींवर बिलकूल विश्वास नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९८१ साली डीन कोन्टोज लिखित 'द आइज ऑफ डार्कनेस' या कादंबरीमध्ये वुहान-४०० म्हणून एका व्हायरसचा उल्लेख करण्यात आला होता. या व्हायरसचा उपयोग प्रयोगशाळेमध्ये शस्त्र म्हणून करण्याचं या पुस्तकाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. 



कादंबरीतील या ओळीसध्या लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत. ज्यामध्ये वुहान-४०० असा उल्लेख करण्यात आला आहे. खुद्द माजी केंद्रीय मंत्री संतोष तिवारी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही भविष्यवाणी शेअर केली आहे. 


संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये उदयास आलेल्या या व्हायरसने आतापर्यंत अनेकांचे प्राण घेतले आहे. एवढचं नाही तर जगातील अनेक लोकांना कोरोना व्हायरसची लागन झाली आहे. दिवसागणिक कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे मृत्यूच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.


आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे १ हजार ८६८ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर एकुण ७० हजार ५४८ लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.